Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगुडमध्ये २३० लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरणराजे समरजितसिंह घाटगे.

 मुरगुडमध्ये २३० लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरणराजे समरजितसिंह घाटगे.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनीधी

जोतीराम कुंभार

--------------------------------------

   स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त राजे फौंडेशन व राजमाता जिजाऊ समितीच्या संयुक्त विद्यमाने येथे दोन आॕक्टोबर रोजी झालेल्या 'चला संकल्प करुया, ७५हजार लाभार्थ्यांना लाभ देऊया' उपक्रमांतर्गत 'समरजितसिंह आपल्या दारी' अभियान झाले होते.पात्र लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित आहेत.त्यांना समरजितसिंह आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आम्ही एक पैसाही न घेता हे लाभ मिळवून देत आहोत. त्यास नागरिकही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. हेच या अभियानाचे यश आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.यावेळी नोंदणी केलेल्या व विविध योजनांचा लाभ मिळालेल्या दोनशे दहा लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांच्या वाटपवेळी ते बोलत होते.

   त्याआधी प्रातिनिधीक स्वरूपात अकरा लाभार्थ्यांना थेट घरी जाऊन घाटगे यांनी मंजुरी पत्रांचे वाटप केले.लाभार्थ्यांच्यावतीने घाटगे यांचा सत्कार केला.


   श्री.घाटगे पुढे म्हणाले,शासकीय योजनांचा लाभ देताना विरोधकांनी गटतट बघून काम केले.त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले आहेत.अशा लाभार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचून त्यांना लाभ देत आहोत.

   कार्यक्रमास शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडिस,अमर चौगुले,दगडू शेणवी,विजय राजिगरे,पांडुरंग पाटील,शिवाजी पाटील,राहूल कांबळे आदी उपस्थित होते.


 यावेळी संकेत भोसले,सात्तापा कांबळे(निढोरी)जयवंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.


   स्वागत विशाल भोपळे यांनी केले. सचिन गुरव यांनी आभार मानले


छायाचित्र- मुरगुड येथे शासकीय योजनांच्या मंजुरी पत्राचे घरी जाऊन वाटप करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे

Post a Comment

0 Comments