Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील उच्च अशा पदावरील सुदाम जाधव यांच्या सह त्याचा वाहन चालक पंधरा हजाराची लाच घेताना अटक.

 जिल्ह्यातील उच्च अशा पदावरील सुदाम जाधव यांच्या सह त्याचा वाहन चालक पंधरा हजाराची लाच घेताना अटक.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर प्रतिनिधी

अन्सार मुल्ला 

--------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी: :- आज कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच वरिष्ठ अधिकारी पंधरा हजार रुपयाची लाच घेताना अटक. सुदाम दादाराव जाधव हे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या वरीष्ठ पदावर कार्यरत होते त्यांच्या बरोबर त्यांचा वाहन चालक उदय लगमाना शेळके याला देखील अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्याची माहिती अशी यातील तक्रारदार याच्या वडिलोपार्जित जमिनीच्या निकालात मदत करतो म्हणून लाचेची मागणी करण्यात आली होती.तक्रारदार यांची वडिलोपार्जित जमिनीची मालकी ही नजरचुकीने चुलत चुलते यांचे नावे लागली होती ती कमी करण्याकरीता म्हणजेच शेतीबाबतचा फाळणी उतारा(पोट हिस्सा)दुरुस्त करून तक्रारदार यांच्या मालकीची शेतजमीन तक्रारदार आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे अन्य सह हिस्सेदार यांच्या नावे लागणेकरता उपसंचालक भूमी अभिलेख,पुणे या प्रादेशिक कार्यालयाकडे 2018 मध्ये अर्ज केला होता. या तक्रारदार यांच्या वरील प्रलंबित अर्जाची सुनावणी भूमी अभिलेख अधीक्षक,कोल्हापूर यांच्या समक्ष सुरू करणेबाबत उपसंचालक यांनी लेखी जिल्हा अधीक्षक यांना लेखी आदेशित केले होते.त्या सदर सुनावणी चा निकाल हा तक्रारदार यांच्या बाजूने देणेसाठी आरोपी लोकसेवक क्रमांक 02 उदय लगमाना शेळके यांनी स्वतः साठी 5,000/-₹ व आरोपी लोकसेवक क्रमांक 01 सुदाम दादाराम जाधव यांचेसाठी 10,000/-₹ असे मिळुन तक्रारदार यांच्याकडे एकूण 15,000/-₹ ची लाचेची मागणी केली तसेच आरोपी लोकसेवक क्रमांक 01सुदाम जाधव यांनी तक्रारदार यांना आरोपी लोकसेवक क्रमांक 02 उदय शेळके यांना त्यांनी मागणी केलेप्रमाणे पैसे दिले का असे म्हणून आरोपी लोकसेवक क्रमांक 02 शेळके यांनी मागणी केलेल्या लाच मागणीस संमती दिली. त्यानंतर तक्रारदार यांचेकडुन आलोसे क्रमांक 01सुदाम जाधव यांनी 10,000/-₹ व आरोपी लोकसेवक क्रमांक 02 शेळके यांनी 5,000/-₹ स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई उप अधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंखे सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश भंडारे हेड कॉन्स्टेबल विकास माने पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर पोलीस नाईक सुधीर पाटील सचिन पाटील चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील अपराध विष्णू गुरव यांनी मिळून केली

Post a Comment

0 Comments