कौंडण्यपूर पिठाधीश जगद्गुरु राजेश्वर माऊली यांना जीवे मारण्याची धमकी पत्र.
कौंडण्यपूर पिठाधीश जगद्गुरु राजेश्वर माऊली यांना जीवे मारण्याची धमकी पत्र.
----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
अमरावती प्रतिनिधी
पी.एन. देशमुख
--------------------------------
अमरावती जिल्ह्यातील विदर्भातील कौंडण्यपूर पिठाचे जगद्गुरु राजेश्वर माऊली सरकार यांना धमकी पत्र जिवे मारण्याचे गुमनाम अज्ञात व्यक्तीने पत्र जगद्गुरु राजेश्वर माऊली यांच्या नावे पाठवले. त्या गुमनाम पत्रामुळे चिंतीची बाब झाली असून, त्यांच्या भक्तगणात संतपाची लाट उसळून आलेली आहे. या धमकीपत्राबाबत पोलीस स्टेशन मध्ये भक्तगणांनी सविस्तर लेखी तक्रार केलेली आहे. या धमकी पत्राबाबत जगद्गुरु राजेश्वर माऊली यांनी भक्तगणांना कुठल्याही प्रकारचा तांडव न करता संयम बाळगावे असा संदेश जगद्गुरु राजेश्वर माऊलींनी दिलेला आहे. परमेश्वराने मला धर्म बचाव करतात नियुक्त केलेले आहे. व या कार्यात अनेक आव्हाने येतातच परंतु अशा आव्हानांना मी भीक घालत नाही. मागील पाचशे वर्ष चाललेला संघर्ष नंतर 22 जानेवारीला आयोध्या येथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केल्या जात आहे. त्या गोष्टीचा मला आनंद आहे व मला हिंदू असल्याचा गर्व आहे. देशाकरता धर्माकरिता व राष्ट्र करतात माझे जीवन संपूर्ण सोपविली आहे अशा प्रकारच्या धमक्याला मी घाबरत नाही. जगद्गुरु राजेश्वर माऊली यांचे असंख्य भक्तगण असून राजेश्वर माऊली यांचे धर्म बरोबर च समाजकार्यात सुद्धा बोलबाला आहे.
Comments
Post a Comment