अनुगामी लोकराज्य अभियान मार्फत श्री राम मूर्ती प्रदान सोहळा साजरा.
अनुगामी लोकराज्य अभियान मार्फत श्री राम मूर्ती प्रदान सोहळा साजरा.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
जावली प्रतिनिधी
सूर्यकांत जाधव
------------------------------
सविस्तर:- अनुगामी लोकराज्य अभियान च्या वतीने पावशेवाडी (बामणोली) येथे श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा पार पडला
22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना पार्श्वभूमीवर अनुगामी लोकराज्य अभियान यांच्या वतीने अनुलोमच्या सक्रिय वस्ती मित्रांना श्री राम मूर्ती व प्रशस्ती पत्राचे वितरण करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरुष या कार्यक्रमासाठी सहभागी झाले .यावेळी फटाक्यांच्या आतिष बाजित व टाळ मृदंगाच्या गजरात श्रीराम मूर्तीचे आगमन पावशेवाडी ग्रामस्थांनी केले.
कार्यक्रमामध्ये अनुलोमचे सामाजिक योगदान व त्यात वस्ती मित्राची भूमिका मांडण्यात आली
यावेळी श्रीरामा चा जयघोष करण्यात आला जमलेल्या लोकांचे आयोजकांनी आभार मानले
Comments
Post a Comment