Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अमरावती मध्ये शहीद स्मारक व थोर महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता.

 अमरावती मध्ये शहीद स्मारक व थोर महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

अमरावती.प्रतिनिधी

पुंडलीकराव ना.देशमुख.

----------------------------------

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला रविवारी अमरावती महानगरातील शहीद स्मारक आणि थोर महापुरुषांच्या पुतळ्याचा स्वच्छता करून पूजन करण्यात आले. शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात येथील ईरवीनचौक स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब, जस्थंबचौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, तसेच चित्रा चौकातील समाज सुधारक महात्मा फुले यांच्या पुतळा तर बडनेरा नवी वस्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी अमरावती विधानसभा संघटक नितीन हटवार, उपमहा नगर प्रमुख संजय शेटे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रमोद धनोकार, तालुकाप्रमुख कपिल देशमुख, जयंत इंगोले सह आदी शिवसैनिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments