सोयाबीनच्या भावात वाढ कधी होणार ? शेतकऱ्यांचा आर्त टाहो.केशवनगर.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
------------------------------
ऑक्टोबरच्या तुलनेत सोयाबीनचे भाव कमी झाले असून भावात सतत घसरत सुरूच असून भाव चार हजार पाचशेवर आले आहेत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सद्यातरी भाव वाढ वाढण्याची आशा धुसर झाली आहे परिणामी साठवणुक केलेले शेतकरी व गोदाम पावती वर कर्ज घेतलेले शेतकरी दुहेरी संकटात सापडले असून रडकुंडीला आले आहेत.
शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी सह सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो मागील तीन दशकापेक्षा अधिक कालावधीपासून सोयाबीन हे शेतकऱ्याची मुख्य पीक झाले आहे या पिकावरच शेतकऱ्यांची खरी भिस्त असते यावर्षी पावसाळा तब्बल एक महिन्याने सुरू झाला त्यानंतरही पाऊस हा अनियमित पडल्यामुळे खरिपाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आली आहे भावात तरी कसर निघेल अशी शेतकऱ्यांना अशा होती परंतु ऑक्टोबरच्या तुलनेत सोयाबीनच्या दरामध्ये जवळपास आठशे ते एक हजार रुपयाची घसरण झाली आहे आज दि.एक जानेवारी रोजी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी चार हजार पाचशे रुपये भाव मिळाला आहे अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भाव वाढतील या आशेवर दिवाळी साजरी करण्यासाठी सोयाबीन गोदामात ठेवून तारण पावती वर कर्ज घेतले आहे ज्यावेळेस कर्ज घेतले त्यावेळे पेक्षा सोयाबीनच्या भावात तब्बल आठशे ते एक हजार रुपयाची घसरण झाल्यामुळे गोदाम भाडे व पावतीवर घेतलेल्या कर्जाचे व्याज यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्यांना तारण घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न पडला आहे भावात सतत घसरण होत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून आजही सोयाबीन विकावी की ठेवावे अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या तरी भाव वाढीची आशा धुसर झाली आहे परिणामी सोयाबीन साठवणूक केलेले शेतकरी तसेच गोदाम पावतीवर कर्ज घेतलेले शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
चौकट.
शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची वल्गना केली होती शेतकऱ्यांचा माल घरात येण्यापूर्वीच इतर देशातून शेतमाल आयात करून स्थानिक बाजारपेठेत शेतमालांचे भाव पाडले जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट तर नाहीत परंतु कर्ज मात्र चौपट झाले आहे. प्रतिक्रिया. माझ्याकडे तीन एकर जमीन आहे १२ क्विंटल सोयाबीन झाली परंतु जर सोयाबीन आत्ताच जर विकले तर लागवडीचा खर्च सुद्धा निघत नाही त्यामुळे हा प्रश्न पडला सोयाबीन घरात ठेवाव की विकावं सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला आहे
0 Comments