Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निढोरीच्या सुवर्ण गणेश मंदिराला आदित्य ठाकरे यांची भेट.

 निढोरीच्या सुवर्ण गणेश मंदिराला आदित्य ठाकरे यांची भेट.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगुड / प्रतिनीधी

जोतीराम कुंभार

---------------------------------

      निढोरी, ता. कागल येथे प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिराला शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे माजी पर्यटनमंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांनी गारगोटी दौऱ्यावर जात असताना धावती भेट दिली. सुवर्ण झळाळी असलेल्या या गणेश मंदिराचा देखणेपणा ठाकरे यांनी न्याहाळला. मंदिराच्या सुवर्ण गणेश मूर्तीचे ठाकरे यांनी दर्शन घेतले. सौ. वंदना सुतार, सौ. छाया शिंदे यांनी ठाकरे यांचे औक्षण केले. यावेळी मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांनी गणेश मंदिर निर्मितीतील माहिती तसेच मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 'कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर पुन्हा येथे नक्की येईन' असा निरोप देऊन त्यांनी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांचा निरोप घेतला.

        युवानेते ठाकरे यांचा शंकरराव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष संजय सुतार, विश्वास दरेकर, डॉ. सचिन मोरबाळे, पवन सुतार, स्वप्निल शिंदे, विश्वास पाटील, सुरज लोहार, विश्वंभर पाटील, हिंमत पाटील, अभिजीत पाटील, श्वेत सुतार तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हा उपप्रमुख संभाजीराव भोकरे, माजी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान मुधाळ तिट्टा - मुरगूड मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली हो ती.

Post a Comment

0 Comments