Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारांची लीखानाच्या माध्यमातून अवस्था व वास्तव !

 पत्रकारांची लीखानाच्या माध्यमातून अवस्था व वास्तव !

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

अमरावती प्रतिनिधी

पीएन देशमुख

---------------------------------

मराठी पत्रकार दिन निमित्त विशेष लेखणी ही तलवारीपेक्षा तिष्ण आहे. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार व गुंडागर्दी या विरुद्ध लढताना फक्त लेखणी चालवा. समोरचा कोण घायल होणार जे पत्रकार खऱ्या बातम्या देण्यास घाबरतात, त्यांनी पत्रकारिता न करता वडापावचा गाडा टाकावा. असे जनतेचे स्पष्ट मत आहे. पत्रकारीता जीवनाची सेवा आहे. ढोंग, विषमता अन्याय यांच्याविरुद्ध उपसलेली लेखणीच्या माध्यमातून तलवार आहे. सत्य व समानता आणि स्वातंत्र्य यांच्या आराधनाची ती पूजा आहे. पत्रकारांच्या लेखणीला तलवारी सारखी धार नसेल, तर सत्य सांगण्याच्या आणि न्याय देण्याचा धंदा त्याला यशस्वीपणे करता येणार नाही. त्याने पत्रकार व्हावे ऐवजी"पात्रकार"व्हावे! असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. पण आज-काल अर्ध्या हळकुंडात न्हालेले पत्रकारांनी पत्रकारितेचा धंदा मांडला आहे. जो पत्रकार सत्य वागतो ,सत्य लिहितो त्याच्याविरुद्ध षडयंत्र केला जातो. दुकानदारी करणारे एकत्र येतात, आणि सत्यवादी पत्रकारिता करणाऱ्या विरुद्ध मोहीम राबविली जाते. दोन नंबर धंदेवाल्यांना हाताशी धरून कणखरपणे सत्य घटनेची लिखाण करणाऱ्या पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केले जातात वसर्वचनाही तर काही पत्रकाराच्या माध्यमातून व्यावसायिक व धंदावाईक लोकांचे जागोजागी पीक वाढले आहे. त्यात बिनकामाचे तन वाढले आहे. अशा चार ओळीची बातमी नीट लिहिता येत नाही, ते पत्रकार म्हणून मिरवत आहेत. समाजाने अशा लोकांना खड्याप्रमाणे बाजूला ठेवायला पाहिजे. जे सत्य लिहितात, अन्याय व अत्याचारा वाचा फोडतात त्यांच्या पाठी तेशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे हीच आज पत्रकार दिनी मी अनुभवातून अपेक्षा करतो.

Post a Comment

0 Comments