Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पक्षपाती निर्णया विरोधात बडनेरा येथे शिवसेनेची निदर्शने शिंदे सरकार व राहुल नार्वेकरांचा यांचा निषेध.

 पक्षपाती निर्णया विरोधात बडनेरा येथे शिवसेनेची निदर्शने शिंदे सरकार व राहुल नार्वेकरांचा यांचा निषेध. 

------------------------------------

 फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

अमरावती. प्रतिनिधी 

पी.एन.देशमुख.

------------------------------------

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात

शिवसेना पक्षाची घटना नाकारून तसेच सुप्रीम कोर्टाचे निर्देश डावलत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदेंची असल्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून हा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करीत शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात बडनेरा जुनी वस्ती चौकात निदर्शने करीत शिंदे सरकार व राहुल नार्वेकरांचा निषेध करण्यात आला..

 शिवसेना कुणाची यासंदर्भात निर्णय येताच संतप्त शिवसैनिकांनी बडनेरा जुने वस्ती चौकात एकत्र येत शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करीत घोषणाबाजी केली आणि शिंदे सरकार तसेच राहुल नार्वेकर यांचा निषेध केला. सुप्रीम कोर्टाचे निर्देश डावलत नार्वेकरांनी दिलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून हा निर्णय पक्षपातीपणा आणि भेदभाव करणारा असल्याचे दिसून आले आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणात न्याय मिळणार असा विश्वास व्यक्त करीत या तथाकथित व कुनियोजित निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या बद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आदर निर्माण झाला आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी यावेळी दिली. या निदर्शने आंदोलनामध्ये राजूभाऊ अक्कलवार, कुच्चीन कैतवास, अक्रम पठाण ,शारीक भाई ,संदीप इंगोले ,नवाब भाई, प्रशांत डेंगळे ,विकास शेळके ,महेश पवार ,जुबेर भाई, सागर ढोके ,सुफियान भाई रिंकू पंचवटे , रफिक भाई आदी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments