Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कचरामुक्त यात्रेसाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार; दररोज उचलला जातोय कचरा.

 कचरामुक्त यात्रेसाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार; दररोज उचलला जातोय कचरा.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार

------------------------------

श्री क्षेत्र माळेगाव, यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून कचरामुक्त माळेगाव ही मोहीम यात्रेत राबवली जात आहे. 


 कचरा मुक्तीसाठी ग्रामपंचायतीने देखील पुढाकार घेतला असून यासाठी विशेष स्वच्छता कर्मचारी लावण्यात आले आहेत. दररोज सकाळी 5 वाजता आणि रात्री 11 वाजेदरम्यान यात्रेत गर्दी कमी झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे सफाई कामगार, यात्रेदरम्यान लावण्यात आलेले सफाई कामगार हे दररोज माळेगाव यात्रेत प्लास्टिक व ईतर कचरा उचलत आहेत. 


 माळेगाव यात्रेतील रस्ते, सर्व चौक, हॉटेल्स, वस्तू विक्री आदी परिसरामध्ये ही मोहीम राबवली जात आहे. ट्रॅक्टरवर ध्वनिक्षेपणाव्दारे यात्रेकरूंना कचरा टाकण्यासाठी आवाहन केले जात असून या मोहिमेला यात्रेकरु व व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माळेगाव यात्रेत यावेळी पहिल्यांदाच कचरा कमी झाल्याचे दिसून येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची कचरामुक्तीची संकल्पना प्रत्यक्षात रूढ होताना दिसून येत आहे. 


 या मोहिमेत सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुवगंडे, उप सरपंच बालाजी नंदाने, ग्रामविकास अधिकारी एस एस. धुळगंडे, ग्राम पंचायत सदस्य सारजाबाई नारायण धुळगंडे, पिराजी वाघमारे, लक्ष्मीबाई गोविंदराव, बाबुराव वाघमारे, कांताबाई गुणाजी जोंधळे, लक्ष्मीबाई शिवाजी मौकोंडे, गोपाळ पाटील, मंजुळा संपत्ती वाघमारे, साहेबराव राठोड, लिपिक खंडू साखरे, बंडू वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, संतुक मुकनर, भुजंग वाघमारे आदी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments