Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

युवा पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने अझरुद्दीन मुल्ला सन्मानित.

 युवा पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने अझरुद्दीन मुल्ला सन्मानित.

कोल्हापुरातील युवा पत्रकार संघाचा १४ वा वर्धापन दिन आणि आजच्या पत्रकारदिनाचं औचित्य साधून, साईक्स एक्सटेन्शन परिसरातील महालक्ष्मी सांस्कृतिक भवनमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं . यावर्षीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार हा पुरस्कार बी न्यूज चॅनलचे पत्रकार अझरूद्दीन दस्तगीर मुल्ला यांना यावेळी माजी परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं . त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथ यावेळी देण्यात आले .

Post a Comment

0 Comments