Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वाचनालय सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

 वाचनालय सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर

-----------------------------

रिसोड शहरातील व तालुक्यातील नेहमीच वाचन संस्कृतीमध्ये वाचन चळवळीमध्ये अग्रेसर असणारे श्री स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय रिसोड या वाचनालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन व सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली ,यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे वाचक गजाननराव लक्रस सर हे होते ,तर प्रमुख अतिथी मध्ये प्राध्यापक रवी अंभोरे सर सदस्य ब्रह्मकुमारी मीडिया वींग रिसोड सेंटर हे होते यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष शालिग्राम जी पठाडे यांनी विचार व्यक्त केले तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय रिसोड येथे नेहमीच विविध उपक्रम,शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके कादंबऱ्या विविध वाचनीय साहित्य दिवाळी अंक उपलब्ध असते, त्यामुळे वाचनालयात या वाचनालयात सर्व महापुरुषांच्या महामानवांच्या जयंती व उपक्रम नेहमी साजरी होत असतात यावेळी कार्यक्रमासाठी प्रामुख्याने गजाननराव बाजड ,प्राध्यापक हाडे सर, अशीष धोपटे वाचनालयाचे कर्मचारी, सुजल गणवीर, सुमेध इंगोले ,अक्षय अंभोरे, यांच्यासह वाचक उपस्थित होते ,यावेळी कार्यक्रमाचे आयोजन स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष कमलाकर टेंमधरे यांनी केले, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल गजानन तारापुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अशीष धोपटे यांनी केले

Post a Comment

0 Comments