Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा.

 आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधी 

प्रमोद पंडित

---------------------------------

भणंग: जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन नुकताच साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी सर तर प्रमुख वक्ते म्हणून ग्रंथालय प्रमुख प्रा.डॉ.सुधीर नगरकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवात श्री रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष मा.प्राचार्य मेजर डॉक्टर अशोक गिरी सर यांच्या करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना रामानुजन यांचे गणित क्षेत्रातील योगदान तसेच जीवनामध्ये गणित विषयाचे महत्त्व पटवून सांगितले.

त्यावेळी ते म्हणाले “ रामानुजन यांनी सुरुवातीला स्वतःचे गणितीय संशोधन एकाकीपणे विकसित केले.त्यांनी आपल्या कामात अग्रगण्य व्यावसायिक गणितज्ञांना रस घेण्याचा प्रयत्न केला,परंतु बहुतांश भाग अयशस्वी ठरला. त्यांना जे दाखवायचे होते ते खूप वैशिष्ट्यपूर्ण, खूप अपरिचित होते आणि असामान्य मार्गांनी सादर केले होते." आपले गणितीय कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील अशा गणितज्ञांच्या शोधात त्यांनी १९१३ मध्ये इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात इंग्लिश गणितज्ञ जी.एच. हार्डी यांच्याशी पोस्टल पत्रव्यवहार सुरू केला. त्यांचे असाधारण कार्य ओळखून हार्डी यांनी रामानुजन यांना केंब्रिजला जाण्याची व्यवस्था केली. त्यांच्या नोट्समध्ये, हार्डी यांनी टिप्पणी केली की रामानुजन यांनी नवीन प्रमेय निर्माण केले होते, ज्यामधील काहींनी "माझा पूर्ण पराभव केला; मी त्यांच्यासारखे काही पूर्वी कधीही पाहिले नव्हते",आणि काही अलीकडे सिद्ध झालेले पण अत्यंत प्रगत परिणाम देखील होते.रामानुजन यांनी आपल्या लहान आयुष्यामध्ये स्वतंत्रपणे सुमारे ३,९०० निकाल संकलित केले; ज्यामध्ये बहुतेक अविकारक आणि समीकरणे आहेत. यापैकी अनेक पूर्णतः नाविन्यपूर्ण होते; रामानुजन प्राइम, रामानुजन थीटा फंक्शन, विभाजन फॉर्म्युले आणि मॉक थीटा फंक्शन्स सारख्या त्यांच्या मूळ आणि अत्यंत अपारंपरिक परिणामांनी गणितामध्ये संपूर्ण नवीन क्षेत्रे उघडली आणि पुढील संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेरणा दिली ”

त्यानंतर प्रा.डॉ.सुधीर नगरकर यांनी स्पर्धा परीक्षेतील गणित व संख्याशास्त्र या विषयाचे महत्व पटवून सांगितले.गणित विभाग प्रमुख प्रा.गजानन चव्हाण यांनी गणित विषयातील नोकरीच्या संधी व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमातील उपक्रम म्हणून सुरुवातीस, विद्यार्थ्यांनी गणितातील विविध संकल्पना सूत्रे व रामानुजन यांचे गणितातील योगदान यावर आधारित भित्तिपत्रके प्रदर्शनाचे प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख प्रा.गजानन चव्हाण व संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा.शुभांगी पाटील यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले बद्दल प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्रीमती दाभाडे यांनी केले तर सूत्रसंचालन साहिल ससाने याने केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विध्यार्थी  उपस्थित होते.शेवटी ज्ञानेश्वरी जवळ हिने  उपस्थितांचे आभार मानले.

===================

Post a Comment

0 Comments