Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आपला संकल्प विकसित भारत अभियान.

 आपला संकल्प विकसित भारत अभियान.

-----------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सांगवडे प्रतिनिधी 

 विजय कांबळे 

-----------------------------------------------

सांगवडे प्रतिनिधी /- आपला संकल्प विकसित भारत या अभियाना अंतर्गत मौजे सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे या गावांमध्ये सर्व विभागांच्या योजनांची माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद विभाग, आरोग्य विभाग अशा सर्व विभागांनी केले. तसेच नागरिकांनी आपले मनोगत ही व्यक्त केली

या कार्यक्रमाबरोबर गरुडा कंपनीचे वितरक यांनी पिकावर फवारणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाने ड्रोन शेतकऱ्यांना डेमो स्वरूपात दाखवन्या साठी आणले होते . मौजे सांगवडेवाडी, सांगवडे व हलसवडे गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शेतकरी वर्ग तसेच अधिकारी या डेमो साठी उपस्थित होते.

    गावच्या कृषी सहाय्यक गीता कांबळे मॅडम यांनी नजीकच्या प्लॉटवर पिकांवर ड्रोन द्वारे फवारणी केल्यामुळे होणारे फायदे याची माहिती ही देण्यात आली. ज्वारी ऊस हरभरा गहू या पिकावर ड्रोनद्वारे कशा पद्धतीने फवारणी करावी या फवारणीमुळे शेतकऱ्यांचा मोलाचा वेळ वाचला जातो तसेच फवारणीत वापरले जाणारे औषध हेही वाचले जाते आवश्यक्य तेवढे औषध आपण फवारणी द्वारे दिले जाऊ शकते याचे प्रात्यक्ष फवारणी प्लॉटवर दाखवण्यात आली व याची माहिती दिली. 

      या कार्यक्रमास सांगवडे गावचे सरपंच रूपाली कुंभार मॅडम उपसरपंच देसाई मॅडम व सांगवडे गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य , पोलीस पाटील रोहिणी माने, सांगवडे गावचे तलाठी, ग्रामसेवक सारिका बंडगर ,प्रगतशील शेतकरी तसेच सांगवडेवाडी गावाचे सरपंच सुदर्शन खोत प्रगतशील शेतकरी रावसो खोत महिला शेतकरी वर्ग विजया जाधव प्रियांका चौगुले ,हलसवडे गावातील सरपंच माननीय वनिता साळुंखे मॅडम ग्रामपंचायत सदस्य सर्व बॉडी ,प्रज्ञा कांबळे ,भिमाबाई कांबळे, शीला पाटील ,ग्रामसेवक रोहिणी हावळ प्रगतशील शेतकरी रावसो पाटील, शिवगोंड पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments