विजयसिंह मोरे यांच्या जयंतीनिमित्त सरवडेत मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर भावपूर्ण वातावरणात संपन्न.
विजयसिंह मोरे यांच्या जयंतीनिमित्त सरवडेत मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर भावपूर्ण वातावरणात संपन्न.
---------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------
गोकुळ दूध संघाचे माजी संचालक व बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त ११ जानेवारी रोजी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे व पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा वितरण गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट कदमवाडी यांच्या सहकार्याने पोटाचे विकार, मूत्रपिंड, थायरॉईड, कर्करोग, अपेन्डिस, लहान मुलांचे आजार मेंदूवरील उपचार, रक्तदाब मलेरिया, डेंगू चिकन आदी रोगावरती मोफत उपचार, स्त्रियांच्या पिशवीचे आजार, हाडाच्या शस्त्रक्रिया, नाक कान घसा, डोळ्यांचे आजार, मानसिक रोग व त्यावर उपचार, त्वचारोग अशा विविध आजारांवर उपचार अतिशय भावपूर्ण वातावरणात संपन्न अनेक रूग्नांनी या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी प्रास्ताविक गोकुळचे संचालक आर. के. मोरे स्वागत व प्रास्ताविक केले. तसेच बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, सहकारमहर्षी मा. आम. के. पी. पाटील साहेब यांना 'चीनीमंडी नवी दिल्ली' या नामांकित संस्थेमार्फत 'साखर उद्योगातील योगदानाबद्दल' देशपातळीवर दिला जाणारा SEIA AWARD २०२४ हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या गतस्मृतींना उजाळा दिला. तुम्ही परत येणार नसला तरी आम्ही तुमची वाट पाहतच रहावू. आजच्या दिवशी सर्वांच्या डोळ्यातून पाणी आले कारण लाखों जीवांना आधार देणारा घास भरवणारा पालनहार आपल्यामधून कायमच्यासाठी दूर निघून गेला. अशा बोलक्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी चेतन नरके यांनी आमचे वडील नरके साहेब यांचे व स्वर्गीय मोरे साहेब यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांचे सामान्य माणांसाबद्दलचे काम हे कधीच विसरता येणार नाही असे सांगीतले यावेळी ज्येष्ठ आधारस्तंभ डी. के. मोरे, लोकनियुक्त सरपंच रणधिरसिंह मोरे, सत्यजित जाधव, सचिन घोरपडे, सुरेश नाईक, जीवन पाटील, धैयशिल पाटील, ए. डी. पाटील, रमेश वारके, शाकिर पाटील, अभिषेक डोंगळे, डॉ. ए. बी माळवी, आनंदा पाटील कासारपुतळे, भिकाजी एकल पनोरी, साताप्पा पाटील शेळेवाडी, यावेळी कार्यक्रमाचे आभार बिद्रीचे संचालक डी. एस. पाटील यांनी केले व सुत्रसंचालन प्रा. अतूल कुंभार व एस. के. पाटील यांनी केले.
Comments
Post a Comment