Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन.

 वाशिम जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन..

 -----------------------------------

फ्रंटलाईन महाराष्ट्र प्रतिनिधी 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत.ठाकुर

-----------------------------------

प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वि तर तज्ञभाग, जि. प. वाशिम,जिल्हा मुख्याध्यापक संघ वाशिम व जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने भावना पब्लिक स्कूल, देगांव येथे दि.10 जानेवारी 2024 रोजी वाशिम जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न झाले.

प्रदर्शनीच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, अध्यक्ष म्हनून भावना पब्लिक स्कूलचे प्राचार्य अब्दुल गफ्फूर मनियाल तर प्रमुख अतिथी म्हणून योजना शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे, गटशिक्षणाधिकारी ब्रदीनारायन कोकाटे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद नरवाडे, रिसोड तालुका अध्यक्ष साहेबराव जाधव,प्राचार्य दिनकर सरकटे, प्राचार्य सज्जन बाजड, विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भड, प्रभारी विज्ञान पर्यवेक्षक ललित भूरे, विज्ञान अध्यापक मंडळाचे संतोष गिरहें, रिसोड तालुका अध्यक्ष अरविंद ठाकरे व परीक्षक गण आदी मान्यवर उपस्थित होते. 

             उद्घाटनीय कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजनाचा उद्देश विभागीय विजय भड यांनी स्पष्ट केला. एकता सिंग राजपुत यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी विज्ञान प्रतिकृती कक्षाची फित कापून विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन केले व उद्घाटनीय भाषणात संशोधक वृत्ती वृद्धींगत करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. योजना शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी आपल्या मनोगतात बालशास्त्रज्ञाना शुभेच्छा दिल्यात.माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनात विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात अब्दुल गफ्फूर मनियाल यांनी आजच्या शिक्षण प्रणालीबाबत मार्गदर्शन करुन मानवी जीवनात विज्ञानाचे महत्व विषद केले. 

       कार्यक्रमाची सुरवात भावना पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनीनी समूह नृत्य व समूह गिताने केली.सदर प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटात 27, माध्यमिक गटात 28, शिक्षक गटात 14 अशा एकूण 69 प्रतिकृतींचा समावेश या प्रदर्शनीत करण्यात आला होता. सदर प्रदर्शनीला वाशिम जिल्हातील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांनी भेटी दिल्या. उद्घटनीय कार्यक्रमाचेे सुत्रसंचालन नागेश ईसापुरे यांनी तर आभार संतोष गिरहें यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भावना पब्लिक स्कूलचे प्राचार्य शिक्षक,शिक्षकेत्तर कर्म. व विज्ञान अध्यापक मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments