Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

यमगे च्या सरपंचपदी मुश्रीफ गटाच्या प्रमिला पाटील बिनविरोध.

 यमगे च्या सरपंचपदी मुश्रीफ गटाच्या प्रमिला पाटील बिनविरोध.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनीधी 

 जोतीराम कुंभार

------------------------------

  यमगे ता.कागल येथील सरपंच पदी मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या प्रमिला मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी प्रशांत गुरव होते.निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत डॉल्बीच्या आणि हलगी कैचाळ च्या ठेक्यावर नूतन सरपंचाची मिरवणूक काढली.         यमगे ग्रामपंचायतीवर मुश्रीफ संजय घाटगे गटाची सत्ता आहे.यामध्ये या आघाडीकडे सहा तर विरोधी मंडलिक राजे आघाडीकडे पाच सदस्य आहेत.सुरवातीच्या काळात संजय घाटगे गटाचा एकच सदस्य असताना ही मुश्रीफ गटाने दिलीप पाटील यांना सरपंच पदाची संधी दिली होती.त्यानंतर विजया कुंभार यांची निवड झाली कुंभार यांनी आपला कार्यभार पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला.त्यामुळे रिक्त पदावर आज पाटील यांची निवड झाली.        सदस्य संदीप किल्लेदार यांनी नाव सुचवले.यावेळी तलाठी विजय गुरव, उपसरपंच ज्योती लोकरे,दिलीप पाटील,विशाल पाटील,विजया कुंभार,यांच्यासह शामराव पाटील, शिवाजीराव पाटील,महादेव पेडणेकर, साताप्पा पाटील, कीरण पाटील,राजू सावंत,दगडू किल्लेदार,मारुती पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments