भराव टाकून पुल झाल्यास नदी काठावरील गावाना पुराचा तडाखा बसणार - नाना पाटील.
भराव टाकून पुल झाल्यास नदी काठावरील गावाना पुराचा तडाखा बसणार - नाना पाटील.
-------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
निपाणी प्रतिनिधी
बबन कुंभार
------------------------
यमगरणी तालुका निपाणी मांगुर फाटा येथे सध्या एन एच फोर या हायवे रोडचे काम चालू असून मांगुर फाटा येथे सध्या भराव टाकून पुलाची कामे चालू आहे भराव टाकून पूल झाल्यास वेदगंगा नदी काठावरील निपाणी आणि कागल तालुक्यातील अनेक गावांमध्ये महापुराचा धोका होण्याची दाट शक्यता असल्यामुळे वेदगंगा नदी काठावरील जनतेने कुरली तालुका निपाणी येथील नाना पाटील या सामाजिक कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे वेदगंगा नदी काठावरील कागल आणि निपाणी तालुक्यातील जनतेने आज कोल्हापूरचे खासदार श्री धनंजय महाडिक यांना निवेदन देऊन पुलाचे काम थांबवण्यास सांगितले कमानी ब्रिज व्हावा अशा मागणीचे निवेदन श्री धनंजय महाडिक आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले तसेच आज दिनांक तीन एक 2024 रोजी बेळगाव जिल्हाधिकारी आणि बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात येणार आहे ज्येष्ठ समाजसेवक नाना पाटील यांनी आमच्याशी बोलताना सांगितले
Comments
Post a Comment