Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक फलकास जोडे मारून करवीर शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तीव्र निदर्शने.

 राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक फलकास जोडे मारून करवीर शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तीव्र निदर्शने.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-----------------------------

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेसह १६ आमदारांना पात्र ठरवत शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदेंना दिले. या निकालाच्या विरोधात करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने उंचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक फलकास काळे फासून जोडे मारत व काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी नार्वेकर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निदर्शने केली.* 

    *यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांचे गटनेतेपद व भरत गोगावले यांचे प्रतोदपद अवैध ठरवले होते. मात्र नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचे पालन न करता त्यांच्या नियुक्त्या वैध ठरवत सुप्रीम कोर्टाचा अपमान केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना सुरत, गुवाहाटी ला पळून गेलेल्या गद्दार चोरांच्या घशात घालण्याचे काम नार्वेकर यांनी केले आहे. मात्र खरी शिवसेना ही जनतेच्या न्यायालयातच ठरणार आहे. व जनता यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. निकाल काहीही असला तरी आम्ही सर्व शिवसैनिक उद्धवसाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत असे सांगितले.* 

    *यावेळी उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर व उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.*

    *यावेळी शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे  पक्षप्रमुख उद्धवसाहेब व आदित्यसाहेब यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.* 

    *यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, उपतालुकप्रमुख राहुल गिरुले,  युवासेनेचे सुनील चौगुले, योगेश लोहार, संतोष चौगुले, सागर पाटील, सचिन नागटीळक, विराग करी,शरद माळी, बबलू मोरे, कैलास जाधव, बाळासाहेब नलवडे, गौरव धनवडे, सागर नाकट, सुनील पारपाणी, दिपक पोपटाणी, अजित पाटील, अजित चव्हाण, प्रमो तोद शिंदे, विनायक क्षीरसागर, मोहन आवळे, पवन आवळे, शैलेश पोवार, उलफ्त मुल्ला आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

   *तसेच चंद्रभागा अत्याळकर, आवसा सोनोले, शशिकला भोसले, निर्मला लोंढे, सुरेखा लोंढे, संगीता आवळे आदी महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.*

Post a Comment

0 Comments