जल जीवन मिशन अंतर्गत भणंग येथील फिल्टर प्लांट ची व टाकीची पहाणी करताना ग्रामस्थ.
जल जीवन मिशन अंतर्गत भणंग येथील फिल्टर प्लांट ची व टाकीची पहाणी करताना ग्रामस्थ.
-----------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
भणंग प्रतिनिधी
चंद्रशेखर जाधव
-----------------------------------
भणंग--केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने मोजे भणंग तालुका जावली येथे माननीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रयत्नातून सदर योजना.
मंजुरी 2022 मध्ये या योजने साठी 44 लक्ष रुपये निधी मिळाला या योजनेचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच माननीय आमदार श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन होऊन संपूर्ण गावाला फिल्टरयुक्त जल पिण्यास मिळणार आहे सदरच्या कामासाठी आपली स्वतःची जागा फिल्टर टॅंक साठी देऊन श्रीमती रंजना नारायण जाधव ग्रामपंचायत सदस्य यांनी गावासाठी मोठे योगदान दिले आहे सदर 44 लाखांमध्ये नदीपासून ते पिण्याच्या टाकीपर्यंत नवीन पाईप लाईन तसेच फिल्टर टॅंक तसेच पिण्याच्या टाकीची दुरुस्ती वकाही ठिकाणी डिस्टीब्यूटर लाईन टाकायची आहे, सदर प्लांटची पहाणी करताना ग्रमस्थ जिल्हा परिषद सदस्य श्री मच्छिंद्रनाथ शिरसागर माजी सरपंच सुहास जाधव, मा. चेअरमन. सुरेश बुवा जाधव, माजी हनुमान उदय मंडळ अध्यक्ष अविनाश जाधव, रोहन जाधव प्रशांत जाधव, भरत जाधव जितेंद्र जगताप ,रमाकांत जाधव ,उत्तम लोहार, दिलीप जाधव
तसेच सरपंच गणेश जगताप ग्रामपंचायत सदस्या यांनी हे कामजागरूकपणे सर्वांनी एकत्र येऊन पूर्णत्वास न्यावे ही गावातील नागरिकांकडून मागणी होत आहे पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे
Comments
Post a Comment