Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अमरावती येथे आठ हजार ट्रक, टँकरची चाक थांबली; हिट अँड रन कायद्याला विरोध.

 अमरावती येथे आठ हजार ट्रक, टँकरची चाक थांबली; हिट अँड रन कायद्याला विरोध.


-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

अमरावती प्रतिनिधी 

पुंडलिक राव देशमुख 

-------------------------------------

देशव्यापी संपात सहभागी, नागपुरी गेट ते जिल्हा कचेरी पर्यंत दुचाकी रॅली, केंद्र सरकारला शिष्टमंडळाने पाठवले निवेदन. केंद्र सरकारकडून वाहन चालक मालकासाठी प्रस्तावित असलेल्या हिट अँड रन या कायद्याला रोड ट्रान्सपोर्ट तीव्र विरोध केला आहे. त्या अनुषंगाने सोमवारपासून संप करण्यात आला असून, अमरावती जिल्ह्यातील सुमारे आठ हजार ट्रक-टँकरची चाके थांबली आहेत. हा अन्यायकारक कायदा मागे घ्यावा, या मागणीसाठी नागपुरी गेट ते जिल्हा कचेरी पर्यंत अमरावती येथे दुचाकी रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी मार्फत केंद्र सरकारकडे निवेदन पाठविण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनातून केंद्र सरकारने २८ जानेवारी २०२३ रोजी लोकसभा अधिवेशनात वाहन चालक-मालकासाठी एक आद्यादेश पारित केला आहे. यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत हिट अँड रन अन्वये वाहनाच्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वाहन चालकाला सात लाखाचा दंड द्यावा लागेल अथवा दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. वाहन चालकासाठी हा नवा कायदा अन्यायकारक असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि युनायटेड फ्रंट राष्ट्रीय मोर्चा या देशातील दोन मोठ्या ट्रान्सपोर्ट संघटनेच्या बॅनरखाली ट्रान्सपोर्ट, ट्रक चालक मालकांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या जिल्ह्यातील सात हजार ट्रान्सपोर्ट व्यावसायिक 500 पेट्रोल डिझेल टँकर चालक-मालक यासह १६० मालधक्का ट्रक चालक मालकांचा समावेश आहे. तसेच या संपात प्रमुख सातवाहन चालक मालक संघटना सहभागी झाले आहेत. त्यामुळे जागोजागी ट्रक टँकर व अन्य वाहनांनी चाके थांबवली आहेत.

Post a Comment

0 Comments