Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

करवीर तालुका पत्रकार संघ पत्रकार दिन कार्यक्रम.

 करवीर तालुका पत्रकार संघ पत्रकार दिन कार्यक्रम.

-----------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सांगवडे प्रतिनिधी 

 विजय कांबळे

-----------------------------------------------

सांगवडे प्रतिनिधी/ स्वातंत्र् पूर्व काळात ब्रिटिशांनी प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रांवर आणलेली बंधने झुगारून देऊन सर्व भारतीयांना एकत्र करण्याचे काम भारतीय वृत्तपत्रानं केलं आहे असे प्रतिपादन करवीर चे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केलं. 

 करवीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित केलेला पत्रकार दिन कार्यक्रमात तहसीलदार रावडे बोलत होते. अध्यक्षस्थानी सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र जाधव होते. यावेळी तहसीलदार रावडे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

        तहसीलदार रावडे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचा कार्याचा गौरव करताना त्यांनी मराठी वृत्तपत्राचा पाया घातल्याचे साहित्य सांगितले दर्पण म्हणजे दर्शन आणि म्हणून वर्तमानपत्रे समाजाचा आरसा असल्याचे ते म्हणाले शासनाची बाजू निपक्षपातीपणे प्रत्येक भारतीय लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तपत्रे करत असल्याचे ते म्हणाले सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र जाधव यांनी पत्रकारांच्या कार्यामुळे समाजा तील चांगल्या कामांना प्रोत्साहन मिळतं असल्याचं सांगितलं.

   यावेळी अध्यक्ष प्रकाश नलवडे यांनी उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराची घोषणा केली. यामध्ये दैनिक पुढारी के एस पाटील, दै सकाळ संजय दाभाडे, लोकमत संजय व्हनाळकर, दै तरुण भारत चे दयानंद जाधव 

दै पुण्यनगरी एकनाथ जगदाळे यांना करवीर भूषण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर केले. यावेळी ज्येष्ठ सदस्य प्रा एस.पी. चौगले, कुंडलिक पाटील यांनी मनोगत केली . यावेळी गेली सात वर्ष अॅड सी. बी. कोरे हे प्रत्येक पत्रकारनां डायरी देण्यात येत आहे . त्याप्रमाणे या वर्षीची डायरी वितरण मान्यवर याच्या हस्ते करण्यात आलंय . त्याचबरोबर पत्रकार संजय दाबाडे यांनी दाभोळकर कॉर्नरच्या सिग्नला चाळीस हजार रु सापडले होतंय . ते प्रामाणिक पणे परत केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .

यावेळी उपाध्यक्ष जालिंदर पाटील, सचिव मच्छिंद्र मगदूम यांच्यासह संघाचे सर्व सदस्य व करवीर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments