Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गौण खनिज वाळू चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई डंपरसह गौण खनिज असा एकूण आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त औंध पोलिसांची कारवाई..

 गौण खनिज वाळू चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई डंपरसह गौण खनिज असा एकूण आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त औंध पोलिसांची कारवाई..

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

अमर इंदलकर. 

----------------------------

      दिनांक 02/01/2024 रोजी चे रात्री औंध पोलीस ठाणे हद्दीतील जयरामस्वामी वडगाव ता. खटाव येथे चोरटी वाळू वाहतूक होणार असलेबाबत सहा पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांना गोपनीय माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून केले कारवाईमध्ये डंपरसह गौणखनिज वाळूची सुमारे 08,20,000 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून डंपर मालक नवनाथ बळवंत दुबळे रा. येरळवाडी ता. खटाव व मालक हेमंत राजेंद्र गोडसे रा. वडूज ता. खटाव यास ताब्यात घेऊन अटक करणेत आली आहे. सदरबाबत औंध पोलीस ठाणेस गु.र.नं. 01/2024 भा.दं.वि.सं. कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

         सदरची कामगिरी मा. श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प वडूज यांचे मार्गदर्शनाखाली औंध पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, पोलीस हवालदार प्रवीण कारंडे, रवींद्र बनसोडे, किरण हिरवे, प्रमोद इंगळे, मेगा फडतरे आरसीपी प्लाटूनकडील अंमलदार पोकाॅ सपकाळ, राक्षे यांनी पार पाडली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक आर. एस. सरतापे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments