Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड येथून येऊन लोहा हद्दीमध्ये तलवारीने दहशत माजवणारे आरोपी लोहा पोलिसांकडून अटक. दोन तलवारी दोन मोबाईल व एक स्कुटी जप्त.

 नांदेड येथून येऊन लोहा हद्दीमध्ये तलवारीने दहशत माजवणारे आरोपी लोहा पोलिसांकडून अटक. दोन तलवारी दोन मोबाईल व एक स्कुटी जप्त.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि .

अंबादास पवार 

---------------------------------

दि.6/1/2024 रोजी संध्याकाळी नांदेड येथून दोन आरोपी सोरणसिंग मंगलसिंग जुनी रा. नमस्कार चौक नांदेड व गजानन कांबळे हे लोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पानभोशी या गावाकडे दोन तलवारी हातामध्ये घेऊन एका स्कुटी वर येत आहेत अशी माहिती एका खबरीने पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांना दिली. त्यावरून तात्काळ पानभोशीच्या दिशेने पीएसआय काळे मॅडम, पोहवा मुलूमवाड चोपवाड, डफडे मेकलवाड यांच्या दोन टीम करून नाकाबंदीकामी आणि त्यांना पकडण्या कामी रवाना झाले,


 दोन्ही आरोपी नांदेड कडून टू व्हीलर वर येत असल्याने पोलीस कंटिन्यू त्यांच्या लोकेशन बाबत माहिती घेत होते. सदरचे आरोपी पानभोशी येथील चौकामध्ये येऊन हत्यारासह थांबलेल्या अवस्थेमध्ये असताना त्या ठिकाणी तात्काळ पोलीस यांनी जाऊन सदर दोन्ही आरोपीस अटक केली त्यांच्याकडील दोन तलवारी एक स्कुटी जप्त केली.

 लोहा पोलीस स्टेशन येथे पोहवा मुलूमवाड साहेब यांचे तक्रारीवरून रात्री शस्त्र अधिनियम कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

 सदरचे आरोपी नांदेड येथून तलवारी घेऊन का आले कशासाठी आले त्यांचा उद्देश काय होता अवैध्य शस्त्र वापरून एखादा गुन्हा करायचा होता का शस्त्र कोणाला विकायचे होते याबाबत तपास पोलीस करत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास हे पोलीस हवालदार चोपवाड साहेब करत आहेत.

 नांदेड येथून खुलेआम तलवारी घेऊन येणाऱ्या आरोपीता पोलिसांनी ट्रॅप लावून तात्काळ पानभोशी येथे अटक केले आरोपीकडून एखादा मोठा गुन्हा घडण्याची शक्यता होती सदरचा गुन्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखला गेला.

 सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कांबळे मॅडम, पोलीस अमलदार मुलूमवाड चोपवाड डफडे मेकलवाड यांनी केली.

Post a Comment

0 Comments