हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतील खुनाचा गुन्हा उघड, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेलंगणा राज्यातील ३ आरोपींना केली अटक.

 हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतील खुनाचा गुन्हा उघड, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेलंगणा राज्यातील ३ आरोपींना केली अटक.


--------------------------------------

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-------------------------------------

 गांधीनगर:- हातकलंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाचा तपास लावण्यात स्थानिक गुन्ह्यांविषयी शाखेला यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी भारत पांडुरंग येशाळ वय ३८, रा. रेणूकानगर झोपडपट्टी, मानस हॉटेलचे पाठीमागे, इचलकरंजी या ट्रक रिपेअरी करणा-या मिस्त्रीला दिनांक ०७/०१/२०२४ रोजी ३ च्या सुमारास अज्ञाताने फोन करुन गाडी खराब झालेली आहे असा बहाणा करुन कोरोची ते हातकणंगले जाणारे रोडवर असले चव्हाण टेक, हातकणंगले येथे बोलावून घेवून अज्ञात कारणावरुन, धारदार हत्याराने त्याचे गळयावर, हातावर, पोटावर, छातीवर, पाठीवर, हनुवटी व गालावर वार करुन त्याचा खुन केला होता. त्याबाबत मयताचे वडील पांडुरंग अनंत येशाळ यांनी फिर्याद दिली होती. अज्ञात इसमाविरुध्द हातकणंगले पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नंबर २४/२०२५ भा.दं.वि.सं.कलम ३०२ प्रमाणे खुनाचा दाखल करणेत आला होता. गुन्हयातील मयतावर धारदार हत्याराने वार करून निर्घुण खुन करणेत आलेने गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणे पोलीसांना आव्हानात्मक होते. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना स्वतंत्र तपास पथक तयार करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आपले अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक शेषराज मोरे, संदिप जाधव, पोलीस अंमलदार चंदू ननवरे, राजीव शिंदे, खंडेराव कोळी, शिवाजी जामदार, वसंत पिंगळे, सचिन देसाई, महेश खोत, संजय इंगवले, आयुब गडकरी व रफिक आवळकर यांची ०३ तपास पथके तयार केली. त्यानुसार शोध पथकाने प्रस्तुत गुन्हा घडले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहितीव्दारे सदरचा गुन्हा हा मिरियाला यादगिरी महेश रा. श्रीराम कॉलनी, पोचमा मंदिर मागे, सायबराबाद, हैद्राबाद, राज्य तेलंगणा याने त्याचे साथीदारांसह केला असलेचे निष्पन्न केले. वरील पथकाने तेलंगणा राज्यात जावून, सापळा रचून गुन्हयातील आरोपीत मिरियाला यादगिरी महेश वय २६,,गजुला सत्यनारायण शिवशंकर वय २७, मोहमद अमीर महंमद शरीफ खान वय २४, सर्व रा. श्रीराम कॉलनी, पोचमा मंदिर मागे, सायबराबाद, जि. हैद्राबाद, राज्य तेलंगणा यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे कसून तपास केला असता यातील मुख्य आरोपी मिरियाला महेश याचे मयताचे पत्नीशी अनैतिक संबंध होते याची माहिती मयत यास असल्याने तो त्याचे पत्नीस सतत त्रास देवून मारहाण करीत असलेचे कारणावरुन सदरचा गुन्हा केला असलेची कबूली त्यांनी दिली. नमुद आरोपींना गुन्हयाचे पुढील तपास कामी हातकणंगले पोलीस ठाणेच्या ताब्यात देणेत आलेले आहे. हि कारवाई पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई कोल्हापूर विभाग, मा.अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील गडहिंग्लज विभाग, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे जयसिंगपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र फोटो कळमकर, सहा. पो. नि. प्रशांत निशाणदार, हातकणंगले पोलीस ठाणे तसेच पोलीस उप निरीक्षक शेषराज मोरे, संदिप जाधव, पोलीस अंमलदार चंदू ननवरे, राजीव शिंदे, खंडेराव कोळी, शिवाजी जामदार, वसंत पिंगळे, सचिन देसाई, महेश खोत, संजय इंगवले, आयुब गडकरी, रफिक आवळकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व प्रदिप पावरा सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.