Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पाट पन्हाळा रस्ता कागदावरच पण रस्ते विना पाठ पन्हाळा करांचे हाल.

 पाट पन्हाळा रस्ता कागदावरच पण रस्ते विना पाठ पन्हाळा करांचे हाल.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

 विजय बकरे

----------------------------------

  राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा गावासाठी स्थानिक विकासनिधी व मुख्यमंत्री सडक योजनेतून डांबरीकरणासाठी २.४० कोटी रुपयांचा भरघोस निधी आमदार आबिटकर यांनी दिला. परंतु वनविभागाच्या जाचक अटींमुळे हा रस्ता डांबरीकरणाच्या दुरुस्तीत अडकला आहे. यामुळे गावात येणारी वाहने व एसटी अभावी विद्यार्थी व नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

       ११५० लोकसंख्या असलेले दुर्गम गाव म्हणजे पाटपन्हाळा. अतिशय दुर्गम, वाडीवस्ती व सोयीसुविधांपासून कोसो दूर असलेले हे गाव आहे.प्रतीवर्षी पावसाळ्यात भूसख्खलन हे नेहमी पाचवीला पुजल्याने वारंवार रस्त्यावर चिखल मातीचे ढीग असतात. 

       सुमारे दहा वर्षापूर्वी केलेला रस्ता अलीकडे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे . आमदार आबिटकरांच्या स्थानिक विकास निधीतुन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल २.४० कोटी रुपयांचा या रस्त्यासाठी निधी लावलेला आहे.जवळपास दीड किमी वनविभागाच्या हद्दीत व उर्वरीत ग्रामपंचायत मालकी हक्कातील हा रस्ता आहे. 

   वनविभागाने ग्रामपंचायतीकडे सन १९८० पूर्वीच्या वहिवाटीतील रस्त्याच्या नोंदी व कागदोपत्री दस्तऐवजांची मागणी केली आहे. मात्र या ग्रामपंचायतीची १९९२ साली ग्रुप ग्रामपंचायतीवरुन स्वतंत्र स्थापना झाली आहे. मग १९८० च्या नोंदणीचे दस्तऐवज कोठून सापडणार?दहा वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले असताना आत्ताच त्या जुन्या नोंदी मागून वनविभागाची आडकाठी व मनमानी कारभार सुरु आहे. ग्रामपंचायतीने गाव सभेचा सर्वानुमते ठराव करून लागणारी सर्व कागदपत्रे पूर्णही केलेली आहेत .पण वन्यजीव परवानगी न देता,त्याला टाळाटाळ करत आहे .दहा वर्षापूर्वी केलेल्या रस्त्यात मोठमोठे दगड, उखडलेली खडी,पावसाळ्यात भूसख्खलन झाल्याने आलेले मातीचे ढीग, ठिकठिकाणी गुडघ्या एवढे खड्डे अशी दयनीय अवस्था झाली आहे. यातून दिवसातून एक दोन वेळा येणारी एसटीही गावात यायला धाडस करत नाही. खासगी वाहनधारक जीवमुठीत धरून प्रवास करतात.

Post a Comment

0 Comments