Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

द. दारुचा. अंह....अंह...द. दुधाचा. म्हणत मंडलिक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ.

 द. दारुचा. अंह....अंह...द. दुधाचा. म्हणत मंडलिक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ.

------------------------- 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड/ प्रतिनीधी

जोतीराम कुंभार

------------------------- 

 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाविद्यालयातील विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात चला व्यसनाला बदनाम करूया या कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी सर्वच व्यसनांच्या विरोधी शपथ घेतली. सुरुवातीस विवेक वाहिनीचे प्रमुख प्रा . डॉ . पी आर फराकटे यांनी प्रमुख वक्ते प्रा. टी एस गडकरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. पी एस सारंग त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित असणारे अनिसचे कार्यकर्ते यांचे महाविद्यालयात स्वागत केले. प्रमुख वक्ते प्रा टी एस गडकरी यांनी मुलांना अनेक उदाहरणे देऊन व्यसनामुळे स्वतःची,, समाजाची कशाप्रकारे हानी होत आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली जर आयुष्याच्या सुरुवातीपासूनच आपण कुणाच्याही आग्रहाला बळी न पडता व्यसनापासून दूर राहिली पाहिजे तरच आपल्याबरोबर समाजाची ही प्रगती होते असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा सारंग यांनीही आपल्या व्याख्यानातून व्यसनामुळे आयुष्य कसे बरबाद होते हे उदाहरण उदाहरण देऊन पटवून दिले कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुरगूड अनिस च्या सचिव सारिका पाटील यांनी केले यावेळी अनिसचे जिल्हा प्रधान सचिव हरी आवळे ,अंशुमन कांबळे उपस्थित होते त्याचबरोबर स्थानिक सचिव प्रदीप वर्णे उपस्थित होते. यावेळी अनिस च्या वतीने दूध वाटप करण्यात आले कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आभार अनिसचे भीमराव कांबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments