Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

२ एटीएम गॅस कटरने कापून ४१ लाख पळविले. अमरावती जिल्ह्यातील घटना, सीसीटीव्ही वर मारला स्प्रे.

 २ एटीएम गॅस कटरने कापून ४१ लाख पळविले. अमरावती जिल्ह्यातील घटना, सीसीटीव्ही वर मारला स्प्रे.

-------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

अमरावती प्रतिनिधी

पी एन देशमुख

-------------------------------

अमरावती जिल्ह्यातील तिवसा वरुड येथील एसबीआय चे दोन एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने कापून तोडले. या दोन एटीएम मधून चोरट्यांनी४१लाख४८,६०० रुपया नीलम पास केले. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अमरावती ते नागपूर मुख्य मार्गावर दिवसा येथे एसबीआय चे एटीएम चोरट्यांनी मध्यरात्री फोडले. यावेळी चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश करताच त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरा वर स्प्रे मारला त्यामुळे फुटेज मध्ये चोरट्यांचा चेहरे स्पष्ट दिसू शकले नाहीत. या ठिकाणी एटीएम मधून २०लाख७२,८०० रोख लंपास केली. याप्रकरणी मंगळवारी रात्री दिवसा ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुसऱ्या घटनेत अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील एसबीआयचे एटीएम गॅस कटरनेस कापून मशीन मधील २० लाख७५,८०० रुपयाची रोखलंपास करणारी एक टोळी असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. चोरी करणाऱ्या टोळीत ३ते४ जल असून त्यांनी पांढऱ्या रंगाच्या कालचा वापर केला. दरम्यान आंतरराज्य ही टोळी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एटीएम मधून रेकॉर्ड लंपास केल्याच्या बाबतीत पोलीस पथके मध्य प्रदेश महाराष्ट्र मध्ये करीत आहेत

Post a Comment

0 Comments