Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निजामपूर गावाचे चे नाव श्रीरामपूर करण्यात यावे याकरिता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा ग्राम विकास मंत्राकडे साकडे.

 निजामपूर गावाचे चे नाव श्रीरामपूर करण्यात यावे याकरिता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा ग्राम विकास मंत्राकडे साकडे.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर 

-------------------------------

 निवेदनामधील उल्लेख वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामधील सद्यस्थितीत रिसोड गावालगतच मौजे निजामपूर ग्रामपंचायत अस्तित्वात आहे या गावाचे नाव मोगलाई निजाम कार्यकाळात *निजामपूर* असे नाव देण्यात आले होते आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले मोगलाई संपली त्या काळाची लोकशाही सुद्धा संपुष्टात आलेली आहे परंतु निजामपूर नाव अजूनही अस्तित्वातच आहे मोजे निजामपूर ग्रामस्थ सह अनेक रिसोड वासियांची अनेक वर्षापासून मागणी आहे की ग्रामपंचायत निजामपूर ऐवजी श्रीरामपूर असे शासनाकडून नामांतरण व्हावे सदर नाव बदलून *श्रीरामपूर* नाव देण्यात यावे याबाबत ग्रामपंचायत निजामपूर यांचा ठराव सुद्धा पारित झालेला आहे करिता आपणास या निवेदनाद्वारे नम्र निवेदन देतो की मौ.निजामपूर या गावाचे नाव बदलून *श्रीरामपूर* नाव गावाला नाव देण्यात यावे याकरिता आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही व्हावी याकरिता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यालयात तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब व ग्राम विकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्याकडे पत्रव्यवहार करून मोजे निजामपूर या गावाचे नामांतरण करून श्रीरामपूर करण्यात यावे याची मागणी भाजपाचे महाराष्ट्र उत्तर भारतीय प्रदेश सचिव लाखानसिंह ठाकूर व रिसोड भाजपा शहराध्यक्ष नंदकिशोर मगर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव सानप युवा मोर्चा प्रदेश सचिव सारंग जी निर्भांन भाजपाचे तालुका सरचिटणीस सुनील बेलोकर भाजपा शहर महामंत्री महादेवराव पवार भाजपाचे बबनराव मोरे बापू मंचकराव देशमुख धनंजय मानवतकर कैलास महाजन धनंजय देशमुख गजानन वाळले रणजीतसिंह ठाकुर बाळासाहेब देशमुख या सह या मागणी करिता पत्रावर अनेक भाजप कार्यकर्त्याच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments