Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारा जिल्ह्यातील कराड तालुका परिसरातील सातत्याने शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या ०२ जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी दोन वर्षाकरिता केले तडीपार

 सातारा जिल्ह्यातील कराड तालुका परिसरातील सातत्याने शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या ०२ जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी दोन वर्षाकरिता केले तडीपार.

----------------------------‐-----

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कराड प्रतिनिधी

 वैभव शिंदे

--------------------------------

      सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) आबीद आलम मुजावर, वय २६ वर्षे, तसेच टोळी सदस्य २) साहिल आलम मुजावर, वय २१ वर्षे, दोन्ही सर्व रा. १२१ पालकरवाडा, मंगळवार पेठ, कराड ता.कराड जि. सातारा यांचेवर सातारा जिल्ह्यामध्ये टोळीने बेकायदेशीर जमाव जमवून दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करणेबाबतचे शरीराविरुद्धचे बरेचसे गुन्हे करीत असल्याने कराड शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पी.बी. सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यातील दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी अमोल ठाकूर, उपविभागीय पोलिस अधिकारी कराड विभाग यांनी केली होती.

        यातील टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्ह्यांमध्ये त्यांचेवर कायदेशीर कारवाई करूनही ते जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी अटक, प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता, अशा गुन्हेगारांवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.

        वरील टोळीस मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुका हद्दीतून दोन वर्षांकरिता हद्दपारचा आदेश पारित केला आहे.

         या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो. हवा प्रमोद सावंत, पो. काॅ. केतन शिंदे, म. पो.काॅ. अनुराधा सणस, कराड शहर पोलीस ठाणेचे सफौ संजय देवकुळे, पो.काॅ.आनंदा जाधव, म.पो.काॅ. सोनाली पिसाळ यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Post a Comment

0 Comments