Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कृषी विज्ञान केंद्र वाशिम द्वारे हळद शेती दिन संपन्न.

 कृषी विज्ञान केंद्र वाशिम द्वारे हळद शेती दिन संपन्न.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड.प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर

----------------------

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्र वाशिम द्वारे उद्यानविद्या शाखे अंतर्गत हळद पिकात उत्पादन वाढीसाठी विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत मौजे कोयाळी बुद्रुक , तालुका रिसोड येथे गणेश गव्हाणे यांच्या शेतात राबविलेल्या हळद पीक प्रात्यक्षिक क्षेत्रावर दिनांक 9 जानेवारी रोजी शेती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चे प्रमुख डॉ. आर एल काळे हे होते तर तांत्रिक मार्गदर्शक म्हणून उद्यान विद्या तज्ञ निवृत्ती पाटील व कृषी अर्थतज्ञ डॉ. डी. एन. इंगोले यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून वाशिम जिल्ह्यातील प्रगतिशील हळद उत्पादक शेतकरी गजानन ढवळे, रामचंद्र इंगोले,गोविंद देशमुख, योगेश खानझोडे यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवर व शेतकरी यांनी प्रात्यक्षिक प्लॉटची तसेच त्याच शेतातील पारंपरिक प्लॉटची पाहणी करून बारकाईने निरीक्षणे घेण्यात आली. 

 गणेश गव्हाणे यांनी कृषी विज्ञान केंद्रा द्वारे राबविलेल्या प्रात्यक्षिक प्लॉट बद्दल माहिती दिली. यामध्ये गट्टू बेण्याचा वापर, कमी कालावधीत येणारी पि. डि.के.व्ही. वायगाव वाण, गोकृपा अमृत चा वापर या पद्धतीद्वारे विकसित केलेल्या प्लॉटमध्ये राबविलेल्या संपूर्ण तंत्राबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. निवृत्ती पाटील यांनी दोन्ही प्लॉटमधील महत्त्वाच्या तफावतीमध्ये जसे पिकाची वाढ फुटव्यांची संख्या , फुटव्यांची साईज , कांडीची साईज व कांडीची संख्या इत्यादी मध्ये फरक दाखवून दिला.

तांत्रिक सत्रात सर्वप्रथम योगेश खानझोडे यांच्या शेतात मागील दोन वर्षापासून राबवितात राबविण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकाबद्दल व मिळालेल्या फायद्या बद्दल संपूर्ण माहिती दिली. गोविंद देशमुख यांनी सुद्धा मागील चार वर्षापासून राबवित असलेल्या प्रात्यक्षिक व त्याचे फायदा बद्दल माहिती दिली.

गणेश गव्हाणे यांनी उपक्रमाबद्दल माहिती देत उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात दीडपटीने वाढ होईल अशी माहिती देत केवीके चे आभार मानले

शेतकरी प्रतिनिधी म्हणून गजानन ढवळे यांनी प्रात्यक्षिक व पारंपारिक प्लॉट यामधील दिसलेल्या खर्चाबद्दल सर्वांना माहिती दिली व आलेले परिणाम खरंच उत्कृष्ट असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले . निवृत्ती पाटील यांनी उपस्थित सर्व शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करताना वायगाव हळद या वाणाबद्दल, लागवडीकरता वापरण्यात येणाऱ्या बेण्याचा प्रकार, नैसर्गिक शेती, गोकूपामृत पद्धती इत्यादी बद्दल सविस्तरपणे तांत्रिक मार्गदर्शन केले. डॉ. डी.एन. इंगोले यांनी दोन्ही तंत्रज्ञानामधील आर्थिक निकषांद्वारे अर्थशास्त्र मांडत प्रात्यक्षिकाचे परिणामा बद्दल माहिती दिली.

 अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ आर. एल. काळे यांनी कृषी विज्ञान केंद्राद्वारे हळद तसेच इतर पिकात अशाच प्रकारे राबविण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकांबद्दल आणि इतर उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देत प्रात्यक्षिक राबविलेल्या गणेश गव्हाणे योगेश खानझोडे , गोविंद देशमुख यांचे अभिनंदन करीत शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन केले. 

सदर कार्यक्रमात कोयाळी खुर्द, कोयाळी बुद्रुक, आसेगाव , वरुड तोफा, बिलखेडा, वनोजा, रिठद व इतर गावातील हळद उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन गजानन भिसडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments