Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड तालुक्यातील स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु.विद्यालयाचा रेखाकलेचा 100 % निकाल.

 रिसोड तालुक्यातील स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु.विद्यालयाचा रेखाकलेचा 100 % निकाल.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर

-----------------------------

रिसोड .येथून जवळच असलेल्या धोडप बु .येथील स्व.नरसिंगराव बोडखे विद्यालयाचा रेखा कला परीक्षा 2023- 24 परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून ग्रामीण भागातून शाळेने हे यश संपादन केल्याने सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड व मुख्याध्यापक सज्जनराव बाजड यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक अनंतराव बोडखे यांनी विद्यार्थ्यांच्या या यशासाठी अथक परिश्रम व मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे.

विद्यालयातील एकूण 83 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्यापैकी सर्व विद्यार्थी अ, ब, क या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर कला सुद्धा आत्मसात करणे महत्त्वाचे असते त्या दृष्टीने शाळेमध्ये अशा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे व उपक्रमांचे आयोजन केल्या जात असते. विद्यालयाच्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments