Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कुंभी कासारीचे संस्थापक स्व.डी.सी. नरके यांना आदरांजली.

 कुंभी कासारीचे संस्थापक स्व.डी.सी. नरके यांना आदरांजली.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पन्हाळा प्रतिनिधी 

 आशिष पाटील

-----------------------------

कुंभी कासारी चे संस्थापक अध्यक्ष स्व डी सी नरके यांना त्यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोर असलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी अभिवादन केले. यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास पाटील यांचे प्रमुख उपस्थित होती.

    यावेळी चंद्रदीप नरके म्हणाले आजोबा डी.सी नरके यांनी कुंभी कासारी कारखाना व शेतकऱ्यांची आर्थिक शैक्षणिक व सामाजिक उन्नती समोर ठेवून काम केले. त्यांचा आदर्श समोर असल्याने ऊसाला उच्चांकी दर देण्या बरोबरच कारखान्यात विविध प्रकल्प राबवून यशस्वी केली असल्याचे सांगितले.

 यावेळी कारखान्याचे संचालक अँड. बाजीराव शेलार, अनिल पाटील, विलास पाटील, संजय पाटील, अनिश पाटील,किशोर पाटील, उत्तम वरूटे,पी.डी. पाटील,बळवंत पाटील,प्रकाश पाटील, राहुल खाडे दादासो लाड सर्जेराव हुजरे सरदार पाटील वसंत आळवेकर राऊ पाटील, कृष्णाय कांबळे, प्रमिला पाटील धनश्री पाटील युवराज शिंदे रवी मडके,काटकर उपस्थित होते.


कुंभी कासारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोर असलेल्या स्व डी सी नरके यांच्या पूर्णाकृती पुत्र पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहताना माझी चंद्रदीप नरके सर्व संचालक कार्यकारी संचालक धीरज कुमार माने सचिव प्रशांत पाटील व विविध विभागाचे खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments