रिसोड येथे शिवजन्मोत्सव आनंदात साजरा.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
---------------------------
ज्याचं कतृत्व सूर्या सारखं तेजस्वी. रयते वरची माया चंद्रा सारखी शितल आणि ज्यांचा पराक्रम महासागरा येवढा मोठा आशा जाणता राजाचा जन्मोत्सव सोहळा. रिसोड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती रिसोड द्वारा आयोजित शिवसुर्य प्रतिष्ठान च्या वतीने रिसोड शहरांमध्ये भव्य दिव्य स्वरूपात मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये सर्व जाती धर्मातील मंडळी सहभागी झाले होते सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ चौक येथून राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मुख्याधिकारी सतीश शेवदा आणि ठाणेदार भूषण गावंडे यांच्या हस्ते पूजन करून मोटार सायकल रॅली ला सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर सिव्हिल लाईन मार्गे स्वराज्य रक्षक संभाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले असून जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व दरवर्षीप्रमाणे बबेरवाल चौक जुनी सराफ लाईन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला आहे या रॅलीमध्ये सर्व जाती धर्मातील मंडळी उपस्थित होते सर्वांनी पांढऱ्या टोप्या आणि भगवे फेटे परिधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिजाऊ वंदना घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला प्रसंगी रिसोड शहरासह तालुक्यातील शिवभक्त रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments