सख्या बहिणीचा खून करणाऱ्या तिघाना आंध्रप्रदेशातून अटक.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
---------------------------------
लिंगणूर (ता. कागल ) येथे पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने सख्या बहिनीचा भाल्याने भोसकून खून करणाऱ्या तिघांना मुरगूड पोलिसांनी भीमावरम ( आंध्रप्रदेश) येथून अटक केली आहे.
देवेंद आदमास पवार वय (२०), पियूष उर्फ टायटन पवार(२२), चरण उर्फ शंकर शंकराप्पा पवार(३०) रा. अंजनगाव जि. अमरावती अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. सिकसेन मुरलीधर भोसले याने२००७ मधे अंजनगाव जि. अमरावती येथील पवार कुटुंबातील येवनाबाई हिच्याशी विवाह केला होता. तेव्हापासून सिकसेन तिला माहेरी पाठवत नव्हता. याचा राग देवेंद्र पवार, टायटन पवार यांना होता. त्यातून त्यांनी सिकसेनला लिंगणूर( कापशी) येथे बोलावून घेतले त्यांच्यात वाद सुरु झाला. यावेळी सिकसेनला मारत असताना येवनाबाई मधे आली यावेळी तिला भाल्याने भोसकले त्यात ती जागीच ठार झाली. तेव्हापासून ते तिघेही फरार झाले होते. या घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली होती. मुरगूड पोलिसांनी फोनच्या लोकेशनवरून तिघांना आंध्रप्रदेशातून अटक केली.
या कारवाईत मुरगूड पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी करे, हवालदार संदिप ढेकळे, प्रशांत गोजारे, बजरंग पाटील, मधुकर शिंदे , अमर पाटील, संतोष भांदीगरे सहभागी झाले होते.
0 Comments