Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगुड बस स्थानक येथील बंद असलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू न केल्यास एसटी.

 मुरगुड बस स्थानक येथील बंद असलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू न केल्यास एसटी.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनिधी 

 जोतीराम कुंभार

----------------------------

मुरगुड बस स्थानकामध्ये सुरू असणाऱ्या लांब पल्ल्याच्या पंढरपूर अक्कलकोट या सध्या सुरू असलेल्या आणि पूर्वी बेळगाव मुंबई या गाड्या सुरू करण्याची मागणी आज नागरिकांनी निवेदनाद्वारे केली.

मुरगुड शहरांमध्ये बसच्या अनेक फेऱ्या गारगोटी डेपो मार्फत सुरू आहेत या फेऱ्या उत्पन्नाचे कारण देत बंद करण्यात आले आहेत कोल्हापूरहून येणारी शेवटची बस देखील नागरिकांच्या सोयीसाठी असून देखील ती बंद करण्यात आली त्याचबरोबर पुणे गाडीवर गारगोटी मुरगुड पुणे असा बोर्ड लावून ही गाडी पुणे येथे नेण्यात येते याबाबत नागरिक संतप्त झाले होते यानुसार प्रवासी नागरिक व्यापारी विद्यार्थी यांनी आज मुरगूड बस स्थानक येथे निवेदन दिले. एकाच मार्गावर बस सुरू असून देखील गारगोटी पंढरपूर अक्कलकोट बसचे उत्पन्न जास्त आणि मुरगुडच्या गाड्या बंद का असा सवाल संतप्त नागरिक विचारताना दिसत होते. या गाड्या पुन्हा सुरू न झाल्यास या ठिकाणी मोठे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. यावेळी मुरगुड बस स्टेशनचे कंट्रोलर लिमकर यांनी निवेदन स्वीकारले या निवेदनाची प्रत गारगोटी आगारास देखील सादर करण्यात आली आहे या नियोजनावर सर्जेराव भाट ओंकार पोतदार ,विनायक येरूडकर प्रशांत शहा , उदय शहा बाळासाहेब मकानदार, प्रदीप वेसनेकर ,सुहास बहिरशेठ ,बंदिश पोतदार ,किरण गवाणकर,बबन पोतदार , सोमनाथ यारनाळकर शशिकांत दरेकर, सुशांत मांगोरे, विशाल मंडलिक ,रणजीत मोरबाळे यांच्यासह विद्यार्थी प्रवासी शिवभक्त यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




चौकट


सर्व सामान्यांना परवडणारी अशी बस वाहतूक असते याच विश्वासाने गोरगरीब या गाड्यांमधून प्रवास करत असतात तसेच वारकऱ्यांना पंढरपूर या ठिकाणी जाण्यासाठी तसेच भावी भक्तांना अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर या ठिकाणी जाण्यासाठी ही गाडी सोयीचे असताना ती अचानक का बंद करण्यात आली सवाल नागरिक विचारत आहेत.

Post a Comment

0 Comments