सामाजिक अधिकारीता शिबिराचे माध्यमातून निःशुल्क सहाय्यक उपकरण वितरण संपन्न.

 सामाजिक अधिकारीता शिबिराचे माध्यमातून निःशुल्क सहाय्यक उपकरण वितरण संपन्न.

 

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 मेढा प्रतिनिधी 

शेखर जाधव

----------------------------

520 लाभार्थ्यांना 887 वेगवेगळे जवळजवळ 33 लाख रुपयाचे साहित्य केले वाटप.

शासनाच्या योजना,सदरचे साहित्य तळागाळापर्यंत पोहोचवले जाते हेच पारदर्शक कारभाराचे उदाहरण आहे तसेच अलीमको संस्थेने सातारा जिल्ह्यातील जे दिव्यांग लाभापासून वंचित आहेत त्यांचा सातारा येथे एक कॅम्प घेण्यात यावा त्यांना सुद्धा या उपक्रमाचा लाभ मिळावा

अशी विनंती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग,आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ALIMCO) कानपूर, जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती जावली(मेढा) यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती जावली (मेढा) या ठिकाणी सामाजिक सक्षमीकरण शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांना भारत सरकारच्या एडिप योजनेअंतर्गत मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप

दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले.सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले , बाजार समितीचे संचालक हणमंत शिंगटे ,गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती जावली (मेढा) , संजय धुमाळ ,गटशिक्षण अधिकारी , शिक्षण विभाग जावली , अलिमको संस्थेच्या ज्युनियर मॅनेजर डॉ.श्रीमती.अभिलाषा ढोरे ,डॉ.श्री.निरज मोरया , डॉ.श्री.सृजन भालेराव ,डॉ. श्रीमती.अंजली तसेच सर्व खाते प्रमुख सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी , ग्रामसेवक दिव्यांग बांधवासह या प्रसंगी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सुरुवातीला सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाच्या वतीने उपस्थित दिव्यांग बांधवांची स्वच्छता विषयक जनजागृती विशाल रेळेकर ,आरोग्य सहाय्यक यांनी केली तसेच ग्रामपंचायत विभागाकडील विविध योजनांची माहिती ग्रामसेवक संदीप सावंत यांनी दिली आमदार छत्रपती श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले ,गट विकास अधिकारी मनोज भोसले गटशिक्षण अधिकारी संजय धुमाळ तसेच डॉ.निरज मोरया व प्रतिनिधीक स्वरूपातील एक दिव्यांग भगिनी यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले प्रास्ताविकामध्ये गटविकास अधिकारी भोसले यांनी दिव्यांग बांधवांनी भौतिक प्रगती बरोबर आर्थिक प्रगती सुद्धा करावी असे आवाहन केले तसेच अलिंमको संस्थेने उर्वरित राहिलेल्या दिव्यांग बांधवांकरीता पुन्हा या अशा प्रकारचे शिबिर आयोजित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली त्यानंतर अलिंमको संस्थेच्या डॉ. श्रीमती डोरे यांनी संस्थेच्या बद्दलचे विविध योजनांची माहिती उपस्थिताना दिली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपल्या मनोगतामध्ये अलिमको संस्थेच्य कामाची स्तुति केली.उर्वरित दिव्यांग बांधवां करिता सातारा या ठिकाणी परत अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन संस्थेने करण्याची अपेक्षा व्यक्त केली 


तसेच जावली तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले त्यानंतर प्रतिनिधीक स्वरूपात कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधवांना आमदारांच्या हस्ते स्मार्टफोन , श्रवण यंत्र , तीन चाकी सायकल , बॅटरी ऑटोमॅटिक बॅटरी तीन चाकी सायकल , व्हील चेअर , अंध काठी व इतर विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात आले त्यानंतर उर्वरित सर्व दिव्यांग संपूर्ण दिवसभर करण्यात आले दिव्यांग बांधवांना तसेच उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी बांधवांना पंचायत समिती जावली कार्यालयाच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक नितीन मोहिते सर यांनी केले तसेच प्रस्तावना जावळीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी केली विशाल रेळेकर यांनी आभार मानले .

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.