Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोहा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड 1,33,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त.7 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करणे सुरू.

  लोहा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड 1,33,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त.7 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करणे सुरू.


--------------------------------------------
अंबादास पवार
लोहा प्रतिनिधि 
---------------------------------------------

 सुनेगाव ते हळदव जाणारा पांदण रस्त्यावर लिंबाच्या झाडाखाली 7 जन बावन पत्त्याचा हार जितचा खेळ खेळत असल्याबाबत माहिती लोहा पोलिसांना मिळाली.

 सदर माहितीवरून  पीएसआय रोडे  साहेब लाडेकर डफडे राठोड गुट्टे गिरे यांनी सदर ठिकाणी जाऊन रेड केला.

 यातील तीन आरोपींना पोलिसांनी पकडले तर इतर 4  आरोपी पोलिसांना पाहून घटनास्थळावरून झाडे झुडपात पळून गेले.

 सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी डावावरून बावन पत्त्याचे 11 कॅट, बसायच्या दोन चटया, रोख रक्कम, दोन मोटारसायकली जप्त केल्या.

 पीएसआय रोडे साहेब यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे पोलीस स्टेशन लोहा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

काल रोजी पण लोहा शहरा मध्ये  लोहा पोलिसांनी एका जुगार आड्यावर छापा टाकून 2 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून 29,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Post a Comment

0 Comments