Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लॉयन्स क्लब ऑफ रिसोड गोल्ड लिजंडच्या नविन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ संपन्न.

 लॉयन्स क्लब ऑफ रिसोड गोल्ड लिजंडच्या नविन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ संपन्न.

---------------------------------

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर.

---------------------------------

 जगातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लायन्स क्लब इंटरनॅशनलमध्ये आजवर सदस्यसंख्येच्या बाबतीत अमेरिकेचे वर्चस्व होते. परंतु, आता मात्र भारत चमकदार कामगिरी करीत सदस्यसंख्येच्या बाबतीत अमेरिकेला मागे सारून जगभरातून प्रथम क्रमांकावर येऊन विराजमान झाला आहे दि.29 फेब्रुवारी 2024 रोजी हॉटेल ओजस येथे लॉयन्स क्लब ऑफ रिसोड मिडटाऊन पुरस्कृत लॉयन्स क्लब ऑफ रिसोड गोल्ड लिजंडच्या नविन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला.लॉयन्स क्लब ही एक समान स्वारस्य किंवा ध्येयाने एकत्रित झालेल्या लोकांची संघटना आहे. सेवा क्लब, उदाहरणार्थ, स्वयंसेवी किंवा सेवाभावी क्रियाकलापांसाठी अस्तित्वात आहे.या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लॉ. डॉ. माधवराव मस्के अध्यक्ष -लॉयन्स क्लब ऑफ रिसोड मिडटावून, शपथविधी अधिकारी म्हणून - मा. लॉ.सुनिलजी देसरडा डिस्ट्रीक्ट गर्व्हर्नर लॉयन्स क्लब,इंडक्शन अधिकारी मा.लॉ. मुरलीधरजी उपाध्याय रिजन चेअर पर्सन, प्रमुख अतीथी- मा.लॉ. भरत चंदनानी झेड सी, झोन ५,मा. लॉ. विवेकजी गावंडे रिजन सेक्रेटरी,कार्यक्रम प्रवक्ता मा.श्री. विनोदजी कुळकर्णी प्राचार्य उत्तमचंद बगडीया महाविद्यालय, रिसोड तसेच लॉयन्स क्लब रिसोड मिडटावून चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.सर्वप्रथम या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलंन करण्यात आले.यानंतर पतिज्ञा लॉ.डॉ.विजयप्रसाद तिवारी यांनी वाचून दाखविली.यानंतर अध्यक्षीय भाषणातून डॉ. माधवराव मस्के यांनी क्लब च्या माध्यमातून वर्षभरातील केलेल्या कार्याची माहिती दिली.तसेच समाजाच्या हितासाठी या क्लब च्या माध्यमातून विविध सकारात्मक कामे करण्यात येतील अशी ग्वाही दिली.यासोबतच इतर मान्यवरांची समायोचित भाषणे संपन्न झाली. पदग्रहण समारंभामध्ये सुनील देसरडा यांनी प्रत्येक नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणी मंडळाला आपल्या पदाची व कार्याची माहिती दिली तसेच त्यानुसार कार्य करण्याची शपथ दिली. तसेच लॉयन्स क्लब च्या कार्याची वाटचाल विषद केली.यानंतर प्रमुख वक्ते म्हणून विनोदजी कुळकर्णी प्राचार्य उत्तमचंद बगडीया महाविद्यालय, रिसोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व समाजसेवा कशी असावी, समाजासाठी कार्य कसे करावे याचे विविध दाखले देऊन याची माहिती दिली.यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना लॉ. संतोष वाघमारे यांनी केली. या कार्यक्रमात लॉयन्स क्लब ऑफ रिसोड गोल्ड लिजंड नवनिर्वाचित सभासदांमध्ये अध्यक्ष लॉ. गोविंद तोष्णीवाल उपाध्यक्ष लॉ. मयुर गंजे,लॉ. प्रसाद गांजरे,सचिव लॉ. पंकज नायक,कोषाध्यक्ष लॉ. भूषण देशमुख पि.आर.ओ.लॉ. संकेत जिरवणकर टेमर लॉ. शिवाजी सानप,टेल ट्वीस्टर लॉ. नंदकिशोर शर्मा, बुलेटीन एडीटर लॉ.अभयकुमार औंढेकर यासोबतच विशाल पातुरकर, लॉ. निलेश सारडा,लॉ. प्रतिक अग्रवाल,लॉ.सौ.भाग्यश्री तोष्णीवाल,लॉ.सौ.भाग्यश्री गांजरे लॉ. सौ. निकीता देशमुख,लॉ. सौ. नयन सानप,लॉ. सौ. राजश्री पातुरकर,लॉ. सौ. मयुरी नायक,लॉ. सौ. संध्या सारडा,लॉ. सौ. रूचिता जिरवणकर,लॉ. सौ. शुभांगी गंजे,लॉ.सौ.आराधना शर्मा इ.सर्व संचालक संचालिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार पि.आर.ओ.लॉ. संकेत जिरवणकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments