Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय हस्तलिखित स्पर्धेत विविध शाळा जिल्ह्यात अव्वल.

 जिल्हास्तरीय हस्तलिखित स्पर्धेत विविध शाळा जिल्ह्यात अव्वल.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधि

 शेखर जाधव

-------------------------------

 भणंग:- सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व स्पर्धां सन 2023 - 24 मधील हस्तलिखित लहान गटांमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिभवीने रचला इतिहास 1ली ते 5वी पर्यंतच्या बालचमूंनी ' स्वच्छ सुंदर आदर्श माझे गाव' या हस्तलिखिताची वैविध्यपूर्ण व उत्कृष्टरित्या मांडणी केली.

हस्तलिखिताच्या संपादिका सौ.सुनिता कामटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून या यशाला गवसणी घातली. शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री ज्ञानेश्वर वंदे सर ,सहकारी शिक्षिका सौ. दिपाली दुंदळे मॅडम, सौ. अमिता एरंडे मॅडम यांचे त्यांना सहकार्य लागले .बिभवी शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, पालक वर्ग बिभवी व रिटकवली यांचे विशेष सहकार्य लाभले. 

बिभवी शाळेने मिळवलेले या यशाबद्दल मा. गटशिक्षणाधिकारी श्री संजय धुमाळ साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्रीम. तोडरमल मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी मा. चंद्रकांत कर्णे साहेब , केंद्रप्रमुख मा. श्री अरविंद दळवी साहेब बिभवी गावचे सरपंच मा. श्री संतोष बांदल उपसरपंच मा. सौ काजलताई परिहार ग्राम.सदस्य विक्रम जाधव व सर्व सदस्य ग्रामपंचायत , माजी सरपंच सौ. जयश्रीताई जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री पांडुरंग शिंदे, उपाध्यक्ष योगिताताई कांबळे , माजी अध्यक्ष मा.श्री प्रवीण देशमुख , सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती , मा. श्री राजेंद्र जाधव मा. श्री एकनाथ देशमुख मा. श्री लक्ष्मण दुंदळे सर, मा. श्री कोळी अण्णासाहेब, बिभवी व रिटकवली गावचे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments