Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मेढा नगरपंचायतीचा कर वाढीचा विषय पेटला बाजारपेठ दिवसभर शंभर टक्के बंद.

 मेढा नगरपंचायतीचा कर वाढीचा विषय पेटला बाजारपेठ दिवसभर शंभर टक्के बंद.

---------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

मेढा  प्रतिनिधी 

शेखर जाधव

----------------------------

   अन्यायकारक कर आकारणी कमी करून नगरपंचायतीची बॉडी अस्तीत्वात येत नाही तोपर्यंत जुन्या दरानेच म्हणजे जुन २०२३ मध्ये वाटण्यात आलेल्या करमागणी बीलाप्रमाणेच कर आकारणी करावी या मागणीसाठी आज मेढा शहरात दिवसभर शंभर टक्के कडकडीत बंद  पाळण्यात आला. यावेळी शेकडो नागरिकांनी नगरपंचायतीवर मोर्चा काढून निवेदन दिले.

       मा. नगराध्यक्ष पांडुरंग जवळ , मा.नगरसेवक विकास देशपांडे ,शिवाजीराव देशमुख ,नारायणराव शिंगटे ,संतोष वारागडे ,बाळासाहेब मिस्त्री, फारुख शेख सचिन जवळ , नारायण पवार ,संदीप पवार यांच्यासह अनेक  नागरिकांच्या शिष्टमंडळाने मेढा  पोलीस ठाण्याचे स. पो. नि. संतोष तासगावकर यांना मेढा  बंदचे व मोर्चाचे निवेदन दिले होते .त्या अनुषंगाने आज मेढा  बंद ठेवून मोर्चा काढण्यात आला होता.

       मेढा शहरात वाढीव करआकारणीचा विषय ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेटला असून ही कर आकारणी रद्द करावी व जुन्या दरानेच कर आकारणी करावी .यासाठी आक्रमक झालेले नागरिक पहावयास मिळाले. या अन्यायकारक कर आकारणीच्या विरोधात सुरेश पार्टे  यांनी आत्मदहन करावे लागेल असा इशारा दिला होता .तर नगरपंचायतीच्या विरोधात  वाढीव कर आकारणी विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही निवेदन देण्यात आले होते . यावर मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी जाहीर प्रकटणाद्वारे कर आकारणीबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तर काही लोक याबाबत राजकारण करत असल्याचाही सूचित केले होते.  प्रकटनातील या  वक्तव्यावर मेढा नागरितील  समस्त मिळकत धारक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .याबाबत बोलताना सुरेश पार्टे  म्हणाले  आम्ही काही शिस्टमंडळाने प्रत्यक्ष मुख्याधिकारांना भेटून हात जोडून विनंती केली होती की जुन्या दराप्रमाणेच वसुली करा तसेच आजही आमची तीच मागणी आहे शिवाय कोणत्याही नागरिकाला आम्ही कर भरू नका असे सांगितले नसताना आम्ही शासकीय कामकाजात काय अडथळा केला ? शिवाय जनतेच्या प्रश्नाबाबत आवाज उठवला म्हणून हा काय गुन्हा झाला का ? असा प्रश्न करून आजही आम्ही मुख्याधिकारांना विनंती करतो की त्यांनी गतवर्षाप्रमाणेच म्हणजे 2022 /23 प्रमाणे कर आकारणी करावी.  100% वसुलीसाठी आम्ही ग्रामस्थ म्हणून  सहकार्य करू असे सूचित केले. यावेळी तुकाराम धनावडे, प्रकाश कदम यांच्यासह अनेकांनी आपल्या व्यथा मांडल्या.

      आज करवाढीच्या निषेधार्थ मेढा शहरात अत्यावशक सेवा वगळता 100% कडकडीत बंद पाळण्यात  आला. नगरपंचायतीच्या प्रांगणात मोर्चा आल्यानंतर नागरिकांनी नगरपंचायतीने केलेले करवाढ कशी अन्यायकारक आहे याबाबत आपली मते व्यक्त केली .तसेच नागरिकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. स.पो. नि. संतोष तासगावकर व त्यांच्या सहकार्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोक बंदोबस्त ठेवला होता .

   याप्रसंगी एस एस पार्टे ( गुरुजी ), तुकाराम धानावडे सुरेश पार्टे,संतोष वारागडे ,संजय सपकाळ ,अरविंद जवळ, प्रकाश कदम, सचिन जवळ, सचिन करंजेकर , मधुकर शेलार ,सागर इगावे, किसन कदम, आनंदा कांबळे ,आनंदा दळवी ,हनुमंत धनावडे ,प्रभाकर धनवडे ,सुरेश शेलार ,सुधाकर मोरे ,सत्यवान सणस, दिनकर देशमुख ,सखाराम शिंदे, विकास जाधव, संदीप जवळ रामचंद्र सावंत ,वसंत शिंदे ,इम्रान  आतार ,संदीप पवार, चंद्रकांत चिंचकर ,कमलाकर शेटे ,नारायण पवार ,साहेबराव पवार, दिलीप पुसेगावकर, धनंजय खटावकर यांच्यासह शेकडो मिळकतधारक नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.

X उपस्थित नागरिकांनी अन्यायी करवाढीच्या विरोधात " बोंब " मारली.

X करवाढ कमी न केल्यास येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे यावेळी उपस्थितांचे वतीने बोलले जात होते.

X नागरिकांचे निवेदन स्विकारायला मुख्याधिकारी उपस्थीत नसल्याने त्यांच्या सहाय्यक कर्मचारी यांनी ते स्विकारले

फोटो 

     करवाढी संदर्भात निवेदन देताना .एसएस पार्टे गुरुजी , सखाराम शिंदे, किसन कदम, तुकाराम धनावडे, श्री. भोसले, डि. एस्. देशमुख 

Post a Comment

0 Comments