Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महिलांनी सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याची गरज: सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी थोरात.

 महिलांनी सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याची गरज: सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी थोरात.

-------------------------------------

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-------------------------------------

गांधीनगर:- आजच्या महिलांनी  सर्व  क्षेत्रात सक्षम बनण्यासाठी प्रयत्नशील असणं काळाची गरज आहे. कोणत्याही गोष्टीची हार न मानता नोकरी, व्यवसायात उभे राहून हम भी किसीसे कम नही हे दाखवून दिले पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी थोरात यांनी व्यक्त त्या चिंचवाड ता करवीर येथे  आयोजित केलेल्या  "ति चा प्रवास" या महिला दिनाच्या व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. यावेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच श्रद्धा प्रशांत पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.


 थोरात म्हणाल्या देश, समाज, आणि कौटुंबिक जीवनात यशस्वी होण्यासाठी महिला प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे.  सक्षमीकरणासाठी महिलांनी व्यवसायात उभे करावेत. तसेच समाजात  विधवा महिलांना सन्मान मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तसेच विविध विषयावर महिला जनजागृतीची मोहीम राबवली पाहिजे. दरम्यान या कार्यक्रमात विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या 115 महिलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपसरपंच धन्यकुमार पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पोतदार, गावचे पोलीस पाटील रवींद्र कांबळे, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी उपाध्ये, मेघा पाटील, स्वाती आंबी, चैताली पाटील, सरस्वती पाटील, कविता कांबळे, निखिल पोवार, राहुल पाटील , सचिन जाधव सिद्धोजीराव रणनवरे,  दीपक गंधार सह महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

फोटो ओळ:- चिंचवाड ता.करवीर महिला दिनानिमित्त "ती चा प्रवास"  ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी थोरात यांचा सरपंच श्रद्धा पोद्दार यांनी  सत्कार केला.

Post a Comment

0 Comments