सेंद्रीय शेतीमुळे जमिनपण वाचले व येणारी पुढची पिढी सदृढ व सक्षम बनेल... तानाजी निकम.
---------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------
राधानगरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय,प्रकल्प संचालक आत्मा, लक्ष्मी नारायण नैसर्गिक सेंद्रिय शेतकरी उत्पादक गट यांच्या संयुक्त विद्यमाने राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथं सेंद्रिय शेती,शेतकरी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं.अध्यक्षस्थानी लक्ष्मी नारायण समूहाचे अध्यक्ष शिवाजी भिकू पाटील होते.कार्यक्रमाचा शुभारंभ देशी गायीचे पूजन करून करण्यात आला.
यावेळी कणेरीमठाचे कृषी अधिकारी तानाजी निकम यांनी जमीन वाचवण्याबरोबर येणारी पिढी सदृढ आणि सक्षम करण्यासाठी सेंद्रिय शेतीची गरज व्यक्त करत,शेतकऱ्यांनी शेतीमध्ये लागणारी सर्व खते,औषधे, निविष्ठा स्वतः तयार केली पाहिजेत,जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखताचा वापर करा,भविष्यात रासायनिक खते बंद होणारायत त्यामुळं राधानगरी तालुका पहिला सेंद्रिय तालुका व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करण्याचे अवाहन केलं.यावेळी सेंद्रीय गटस्थापनेबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे, मंडल कृषी अधिकारी अनिल सांगळे, महादेव जाधव, रणजीत गोधंळी लक्ष्मीनारायण समूहाचे शिवाजी पाटील,कृषी भूषण श्रीनिवास बागल यांनी मार्गदर्शन केलं.
यावेळी लक्ष्मीनारायण नैसर्गिक शेती गटाचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील,शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील,आत्मा समिती सदस्य विजय पाटील कौलवकर,सरपंच रणजित पाटील,आत्मा विभागाचे सुनील कांबळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.
0 Comments