पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या मराठा तरुणांना दिलासा.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
-----------------------------
नवी मुंबई :- पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. 2022-23 मध्ये रिक्त झालेली 100 टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतले आहेत. कारण राज्य शासनाने 17 हजार 471 पोलिसांची भरती करण्यासाठी जी जाहिरात काढली त्यात 10 टक्के मराठा आरक्षण देखील लागू राहणार आहे.
काही दिवसांपूर्वी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे. त्यामुळे पोलीस भरतीत देखील हे 10 टक्के आरक्षण मराठा समाजातील तरुणांना लागू असणार असल्याची घोषणा फडणवीसांनी विधानपरिषदेत केली आहे.
0 Comments