सांगलीत शासनाच्या पाच दिवसीय महासांस्कृती महोत्सवास सुरुवात : नागरिकांनी लाभ घेण्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे आवाहन.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सांगली प्रतिनिधी
-------------------------------
सांगली : सांगलीत महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने सांगली जिल्हा महा संस्कृती महोत्सव पार पडत आहे. आजपासून ते 6 मार्चपर्यंत पार पडणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सुमनताई खाडे, अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मनपा उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटनही पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी या पाच दिवसाच्या महासंस्कृती महोत्सवाचा सर्व सांगलीकर नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.
0 Comments