Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गटशिक्षणाधिकारी बीएम कासार यांची रत्नागिरी येथे बदली.

 गटशिक्षणाधिकारी बीएम कासार यांची रत्नागिरी येथे बदली.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

-----------------------------------

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नशील असणारे ,शिक्षकांशी नियमित संवाद ठेवत शिष्यवृत्ती आणि प्रज्ञाशोध परीक्षांसाठी अविरत कार्यरत राहून राधानगरी तालुक्याची शैक्षणिक परंपरा सर्वोच्च उंचीवर नेणारे दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणून बी .एम.कासार साहेबांच्या कडे पहावे लागेल असे गौरवोद्गार राधानगरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.संदीप भंडारे यांनी काढले . 

 

गटशिक्षणाधिकारी बी.एम. कासार यांची रत्नागिरी येथे शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याने राधानगरी तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने आयोजित सदिच्छा समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी बी.एम. कासार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.  


 यावेळी बोलताना बी.एम. कासार म्हणाले की, आई-वडिलांकडून प्राप्त झालेला शिस्तीचा ठेवा,बालपणापासून पुस्तकांशी झालेली मैत्री यातूनच आयुष्याची जडणघडण होत गेली .पुस्तकांनी सातत्याने वैचारिक बळ दिले .साध्या सरळ मार्गाने खडतर प्रवास करत शिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहोचता आलं याच्यासारखा दुसरा कोणताही आनंद नाही .सूक्ष्म नियोजन आणि शिक्षकांची सुसंवाद तसेच समाजातील घटकांनी दिलेले योगदान यामुळेच राधानगरी तालुका राज्यामध्ये सातत्याने प्रथम क्रमांकावर राहिला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले .शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली .


शिक्षकांची सेवा विषयक प्रशासकीय कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहिलो .तसेच राधानगरी तालुका शिष्यवृत्ती मध्ये राज्यात प्रथम क्रमांक वर ठेवण्यासाठी शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांची प्रशिक्षणे ,शाळा पातळीवर शिक्षकांशी सुसंवाद तसेच नियमित सराव चाचण्या यांचेही नियोजन केले .यामुळेच शिष्यवृत्ती परीक्षे मध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी आवर्जून आपल्या भाषणात सांगितले .


राधानगरी पंचायत समितीचा गटशिक्षणाधिकारी पदाचा चार्ज स्वीकारल्याबद्दल दीपक मेंगाणे यांचाही स्वागत सत्कार करण्यात आला.

 

 या कार्यक्रमात केंद्रप्रमुख सुरेश कुसाळे,पंडित पाटील ,विषय तज्ञ ए.वाय. पाटील,शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भीमराव रेपे,जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे ,शिक्षक नेते आणि शिवाजी पाटील, शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस डी.पी.पाटील,शिक्षक नेते नामदेव रेपे,शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील, शिक्षक नेते ज्योतीराम पाटील,उपअभियंता खैरे साहेब, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विजय जांगनुरे, नूतन गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांची भाषणे झाली .

या कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव कडगावकर ,शिक्षक नेते बी.एस.पाटील,संतोष भोसले, प्रकाश कानकेकर,अशोक येरुडकर,प्रदीप पाटील यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख,सर्व संघटना प्रतिनिधी ,पंचायत समितीचा कर्मचारी वर्ग ,प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर मुसळे यांनी केले तर आभार प्रकाश कानकेकर यांनी मानले .

Post a Comment

0 Comments