Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड तालुक्यात उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

 रिसोड तालुक्यात उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रीसोड प्रतिनिधी 

रणजित ठाकुर 

------------------------------------------

शालिग्राम पठाडे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा.

 रिसोड: प्रतिनिधी रणजीत ठाकूर. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने गाव तेथे विविध धम्म शिबिराचे आयोजन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी आयोजन करावे. जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड शाखेच्या वतीने तालुका अध्यक्ष शालिग्राम पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच एक श्रामणेर शिबीर संपन्न झाले. दिनांक १५तारखेपासुन सात गावांमध्ये उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १५मार्च पासुन मांगुळझनक व अंचळ येथे शिबिराला सुरुवात होणार आहे. या शिबिरात केंद्रीय शिक्षिका सरस्वतीताई साबळे, मंदाताई गवई प्रशिक्षण देणार आहेत.


दिनांक १६मार्च सवड मेघाताई राऊत 

 दिनांक १८मार्च पासुन जोगेश्वरी केंद्रीय शिक्षिका संध्याताई कांबळे मुंबई,व सरहद्द पिंपरी येथे नंदाताई भगत , मीनाताई बेलखेडे,ह्या प्रशिक्षण देणार आहेत. 

दिनांक ३०मार्च पासुन वडजी व ‌ ३एप्रिल पासुन जांब आढाव  

 या प्रमाणे दहा दिवस विविध विषयांवर बुद्ध पुजा विधी,त्रिशरण पंचशील, अर्थ, बुद्ध चरित्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, बावीस प्रतिज्ञा, बौद्ध धम्माचा पुजा विधी, मुर्ती पुजा महत्व, बुद्ध कालीन स्त्रीया इत्यादी विषय सांगितले जाणार आहेत

 हे शिबिरांचे आयोजन करण्यासाठी परिश्रम भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी जिल्हा अध्यक्षा संध्याताई पंडित, जिल्हा सरचिटणीस मंदाताई वाघमारे, प्रमिलाताई शेवाळे, महानंदा वाठोरे,मीना चव्हाण,गुंफाबाई इंगोले, सुजाता खरात, तसेच माधव हिवाळे कोषाध्यक्ष, , देविदास सोनुने, रामजी बानकर उपाध्यक्ष,तालुका सचिव, कैलास सुर्वे संस्कार प्रमुख, भिवाजी खंडारे, लक्ष्मण अंभोरे, गणेश कवडे, अभिमन्यू पंडित, नाना चतुर, दिलीप इंगळे, पौर्णिमा अंभोरे, वनिता अंभोरे,शीला अवचार, हे सर्व परिश्रम घेऊन शिबीर यशस्वी करतात,

Post a Comment

0 Comments