किसन वीर महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

 किसन वीर महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी

कमलेश ढेकाणे 

------------------------------

वाई: येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या समारंभासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते श्री. समृद्धीबाबा जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले हे उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना श्री. समृद्धीबाबा जाधव म्हणाले की, "शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे मातेच्या मायेने पाहिले पाहिजे. जीवनामध्ये प्रचंड संघर्ष करावा लागतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अत्यंत चिकाटीने प्रयत्नरत राहिलं पाहिजे तरच विद्यार्थी हा एक सक्षम माणूस म्हणून समाजामध्ये ताठ मानेने उभा राहू शकतो. विद्यार्थ्यांनी अभिजात कलेकडे दुर्लक्ष न करता त्या कलेची जोपासना केली पाहिजे. वरवरच्या गोष्टी या फसव्या असतात तर आंतरिक मनाने घेतलेले निर्णय अमलात आणल्यास विद्यार्थ्यांना जीवनात उज्ज्वल यश प्राप्त करता येते. माझ्या आयुष्यात अत्यंत मातृहृदयी शिक्षक मिळाले म्हणून मी आज तुमच्यासमोर कलाकार म्हणून उभा आहे. अन्यथा मी आज कुठे असलो असतो याची कल्पना करू शकत नाही." 

अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा. मदनदादा भोसले म्हणाले की, "माणसाने कोणता रंग घेऊन कोणाच्या पोटी जन्म घ्यावा, हे त्याच्या हातात नसते. परंतु जीवनामध्ये आपल्या ध्येयाप्रती जागरूक राहून; सतत प्रयत्नवादी राहिले पाहिजे. जीवनामध्ये कधीही कोणाकडे कुठल्याही प्रकारची अपेक्षा आणि तक्रार न करता आपल्या अपेक्षांची पूर्ती स्वतःच्या कर्तुत्वावर पूर्ण करावी." 

या पारितोषिक वितरण समारंभामध्ये २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभागात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे श्री. समृद्धीबाबा जाधव आणि मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, संस्थेचे संचालक श्री. केशवराव पाडळे, श्री. सुरेश यादव, कला शाखेचे उपप्राचार्य प्रो. सावंत, सायन्स शाखेचे उपप्राचार्य प्रो. झांबरे, कॉमर्स शाखेचे उपप्राचार्य प्रो. विनोद वीर, कार्यकमाचे कार्याध्यक्ष प्रा. उत्तम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.  


महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल प्रा. उत्तम कांबळे, शैक्षणिक अहवाल डॉ. राजेश गावित, क्रीडा व राष्ट्रीय छात्र सेनेचा अहवाल कॅप्टन डॉ. समीर पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचा अहवाल डॉ. संग्राम थोरात तर कला व सांस्कृतिक विभागाचा अहवाल डॉ. धनंजय निंबाळकर यांनी सादर केला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. मंजुषा इंगवले डॉ. अरुण सोनकांबळे आणि प्रा. रेश्माबानो मकानदार यांनी केले. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, कार्यालयीन कर्मचारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.