२४वीस वर्षाने बालमित्र गुरु माऊली ज्ञान मंदिरात.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
प्रमोद पंडीत
------------------------------
जीवन शिक्षण विद्या मंदिर भणंग आपल्या १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे त्या निमिताने -
सन - २००० सालच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थीचे स्नेह संमेलन घेण्यात आले
पुर्वी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेचे नाव जीवन शिक्षण विद्या मंदिर असे असायचे तसेच जीवन शिक्षण विद्या मंदिर भणंग शाळेचा १००वा वर्दापण दिनाचे औचित साधून एकत्र आले .
जीवन शिक्षण विद्या मंदिर भणंग हयाच शाळेस जिल्हा परिषद केंद्र शाळा भणंग या नावाने ओळखत आहेत .
आपण आपल्या ज्ञान माऊलीचे काही तरी ऋणी आहोत ह्या स्वच्छ हेतूने सन २००० सालची बॅच एकत्र येऊन स्नेह संमेलन घेऊन ज्ञान माऊलीच्या कुशीत विसावली .
बालपणाच्या आठवणीत सर्व मित्र रमून गेले . आपले वर्ग शिक्षक मा श्री शिंगटे गुरुजी व सौ मंगल जंगमबाई या गुरुचे आर्शिवाद पुन्हा लाभले . शाळेतील लहान मुलांना खाऊ वाटप केला . स्नेह संमेलनात शाळे बाबत व गुरुजीन बाबत व आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या ऐवढ्यावरच न थाबता . वीस हजार पाचशे रुपये गोळा करून ज्ञान मंदिरास मदत केली . व आपले कर्तव्य पार पाडले .
सन २००० सालची बॅच ने सर्व माजी विद्यार्थ्यांनच्या पुढे एक आदर्श ठेवला . या प्रसंगी उपस्थित सर्व माजी विद्यार्थांनी माझ्या लहनपणीची शाळा , शिक्षक तसेच आत्ताच्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांना आपले अनुभव व मार्गदर्शन केले आणि स्वतःचा परिचय ही करून दिला .
0 Comments