Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कराडमध्ये घडलेल्या आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्यात कराड शहर पोलिसांनी दोन हल्लेखोर आरोपीना ०५ दिवसांत ताब्यात घेतले असून.

 कराडमध्ये घडलेल्या आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्यात कराड शहर पोलिसांनी दोन हल्लेखोर आरोपीना ०५ दिवसांत ताब्यात घेतले असून.

-------‐----‐----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कराड प्रतिनिधी 

 वैभव शिंदे

------------------------------------------------

      पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा आँचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर यांनी कराड परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आदेश दिले आहेत. त्यानुसार कराड उपविभागीय पोलीस सात्तत्याने प्रयत्नशील आहेत. 

        दिनांक 23/02/2024 रोजी सांय. 07.18 वाजता कराड शहर पोलीस ठाणेच्या हद्दीत जुन्या कोयना पुला लगत दैत्य निवारणी मंदीरा पासुन काही अंतरावर नदिपात्रात पुरुष जातीचा 30 ते 35 वयोगटातील 05 फुट 05 इंच उंचीचा मृतदेह संशयास्पद मिळुन आला होता. त्याबाबत तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील कराड शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अरुण देवकर, पोलीस उप निरिक्षक पतंग पाटील व स्टाफ यांनी घटनास्थळी जावुन मृतदेहाची पाहणी केली असता मृताची ओळख पटु नये याकरीता मृतास सिंमेटच्या पाईपने काळी दोरीच्या सहयाने बांधून मृत देह नदीपात्रात बुडबोला होता. सदर मृत इसमाचा निघृण खून झाला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली तपासाची दिशा ठरवुन मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु केले. सुमारे 04 दिवस सिंमेटच्या पाईपला बांधलेल्या अवस्थेत मृतदेह पाण्यात राहीलेने पुर्णतः सडलेला होता त्यामुळे ओळख पटविणे आव्हानात्मक होते. मृतदेहाच्या अंगावरील कपडे हातावरील गोंदलेले नाव व चिन्ह या अनुषंगाने ओळख पटविण्यासाठी चौकशी सुरु केली सुरवातीला घटनास्थळापासून काही अतंराबर असलेले नागरिकाचे कडे चौकशी केली मात्र काहिच माहिती मिळत नव्हती दरम्यान मा पोलीस अधिक्षक सातारा श्री. समीर शेख यांनी कराड शहर गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचेसह अधिका-यांची बैठक घेवून तपासाच्या सुचना दिल्या त्यानुसार वेगवेगळी पथके तपासासाठी रवाना झाली, कराड शहर, कराड तालुका, मुंबई, पुणे, चिपळूण सह कर्नाटक राज्यात तपास यंत्रणा राबवली, गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रिक तपासावर जोर दिल्यानंतर अथक प्रयत्न करून कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउनि पतंग पाटील पोलीस हवा- शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक- कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो.शि. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांना आरोपीची माहिती मिळवण्यात यश आले. सदर खुनाच्या गुन्हयामध्ये आरोपी नामे शकील अन्वर शेख वय 20 वर्षे रा. दैत्प्रनिवारणी मंदीर कराड व कृष्णा लक्ष्मण पुजारी वय 24 वर्षे रा. मुजावर कॉलनी कराड ता. कराड जि. सातारा अश्या दोन आरोपींना ताब्यात घेवून चौकशी केली. त्यामध्ये त्यांनी अन्य एकाचे मदतीने खुन केल्याचे उघडकीस आले आहे.त्यानुसार त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपीस दिनांक 07/03/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मजुर करण्यात आली आहे.

     सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल मॅडम सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड़ अमोल ठाकुर, व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील. कराड शहर पोलीस ठाणे. पो नि स्थागुशा श्री अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भापकर, सपोनि बाबर, सपोनि नरोटे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील, पोउनि चोरगे, पोठनि चव्हाण, पोउनि पवार, सफौ रघुचोर देसाई, सफौ संजय देवकुळे, पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलोस नाईक, कुलदिप कोळी, संतोष गाडळे, पो.शि. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ , सुनिल माळी व स्थानिक गुन्हे शाखाचे सपोनि सुधीर पाटील, सपोनि रोहीत फारने, पोउनि अमित पाटील, पोहवा शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण नगदने, लेलेश फडतरे, मयुर देशमुख, अविनाश चव्हाण, मोहन पवार, शिवाजी गुरव, मोसीन मोमीन, पृथ्वीराज जाधव, अरुण पाटील, विशाल पवार, गणेश कापरे,, स्वप्निल कुंभार, वैभव सांवत यांनी केलेली आहे

Post a Comment

0 Comments